रक्षाबंधन होताच 4 राशींच्या लोकांचे नशीब बदलणार! पैसा, मानपान मिळणार, वाचा सविस्तर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : रक्षाबंधन हा सण हिंदू संस्कृतीतील भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव मानला जातो. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमा या दिवशी रक्षाबंधन साजरा केला जातो. या वर्षी रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025 रोजी आहे.
advertisement
1/6

रक्षाबंधन हा सण हिंदू संस्कृतीतील भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव मानला जातो. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमा या दिवशी रक्षाबंधन साजरा केला जातो. या वर्षी रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025 रोजी आहे. विशेष म्हणजे याच दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा आहे. या दिवसाला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे, कारण यंदाच्या रक्षाबंधन दिवशी ग्रहांचे महत्त्वाचे संयोग निर्माण होत आहेत, जे 12 राशींपैकी चार राशींना विशेष लाभदायक ठरणार आहेत.
advertisement
2/6
ज्योतिषशास्त्रानुसार, 13 जुलै रोजी शुक्र ग्रह वक्री होणार आहे, तर 16 जुलै रोजी सूर्य राशी बदलणार आहे. त्यानंतर 28 जुलै रोजी मंगळ कन्या राशीत प्रवेश करेल. या सर्व घटनांनंतर 9 ऑगस्टला मंगळ आणि अरुण ग्रह 120 अंशावर, तर मंगळ आणि शनी 180 अंशावर असतील. यामुळे “नवपंचम राजयोग” तयार होईल. जो धन, मान, पदोन्नती आणि यशाचे प्रतीक आहे. दुसरीकडे “मंगळ-शनी प्रतियुती” मुळे संघर्षातून यश मिळवण्याची शक्यता निर्माण होते.
advertisement
3/6
<strong>मेष - </strong> मेष राशीच्या व्यक्तींना या कालावधीत सर्वच क्षेत्रांमध्ये यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. विवाहयोग्य लोकांसाठी नवीन प्रस्ताव. प्रोफेशनल यश आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी.
advertisement
4/6
<strong>वृषभ -</strong> वृषभ राशीसाठी रक्षाबंधनानंतरचा काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. पद-प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढेल. वैवाहिक जीवनात सुख आणि समजूत. व्यवसायात वाढ, नवीन संधी मिळणार. अध्यात्मिक क्षेत्रात रस वाढेल.
advertisement
5/6
<strong>मिथुन -</strong> मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टींनी भरलेला असेल. अचानक धनलाभ, गुंतवणुकीत यश. कर्ज फेडण्यात यश मिळेल. विद्यार्थी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम काळ. वरिष्ठांची साथ आणि पदोन्नती मिळेल.
advertisement
6/6
<strong>मीन -</strong> मीन राशीसाठी ही वेळ धैर्य, शांती आणि यश घेऊन येईल. नोकरी किंवा व्यवसायात मोठे बदल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ. प्रोफेशनल प्रगती, कर्जमुक्ती मिळेल. शांत,स्थिर आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक काळ आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
रक्षाबंधन होताच 4 राशींच्या लोकांचे नशीब बदलणार! पैसा, मानपान मिळणार, वाचा सविस्तर