Swapna Shastra: स्वप्नात पाहिलेल्या या गोष्टी म्हणजे आर्थिक संकटाचा संकेत! मग कितीही स्टेबल असाल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Dreams Meaning in Marathi: वाईट दिवस कोणावर सांगून येत नाहीत, काहीजण ते स्वत:च्या हातानं ओढावतात तर काहींवर अनपेक्षित दु:खाचा डोंगर कोसळतो. स्वप्नशास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नात एक विशेष अर्थ दडलेला असतो. स्वप्ने आपल्या भविष्यातील घटनांचे संकेत देतात, असं मानलं जातं.
advertisement
1/6

काही विशिष्ट प्रकारची स्वप्नं येणाऱ्या आर्थिक अडचणी किंवा आर्थिक नुकसान संकेत देतात. अशा स्वप्नांचे संकेत आधीच समजून घेतल्यास, मोठे आर्थिक नुकसान टाळता येते. आर्थिक नुकसान दर्शवणार काही स्वप्नांविषयी आज जाणून घेऊ.
advertisement
2/6
स्वप्नात चोर, डाकू किंवा दरोडेखोर दिसणं - स्वप्नात चोर, डाकू किंवा दरोडेखोर पाहणे किंवा त्या लोकांकडून तुमच्याकडील मौल्यवान वस्तू हिसकावल्या जात आहेत, असं स्वप्नात पाहणं हे आर्थिक नुकसानीचा संकेत मानला जातो. अशा प्रकारच्या स्वप्नाचा अर्थ तुमच्या आर्थिक संसाधनांना धोका निर्माण होऊ शकतो किंवा अचानक मोठा खर्च येऊ शकतो.
advertisement
3/6
भिंत कोसळणं किंवा अंगावर पडणं - स्वप्नात भिंत कोसळताना पाहणं हे आर्थिक अस्थिरतेचे लक्षण मानले जाते. स्वप्नात तुम्हाला भिंत तुमच्यावर पडताना दिसली तर याचा अर्थ तुम्हाला नजीकच्या भविष्यात आर्थिक संकट किंवा मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. स्वप्नशास्त्रात, हे मोठ्या आर्थिक आव्हानाचे लक्षण मानले जाते.
advertisement
4/6
तोडलेले अर्धवट झाड किंवा नापीक जमीन पाहणं - स्वप्नात अर्धवट तोडलेली झाडे किंवा उजाड-नापिक झालेली जमीन पाहणं हे आर्थिक नुकसानाचे लक्षण मानले जाते. सुपीक जमीन नापीक झाल्याचे दिसून येणं अशुभ संकेत आहे. यामुळे आर्थिक संसाधने कमी होऊ शकतात किंवा उत्पन्नात अचानक घट होऊ शकते.
advertisement
5/6
वाळू किंवा वाळवंटात चालत असलेलं स्वप्न - स्वप्नात वाळूवर चालत असल्याचं पाहणं अस्थिरता आणि आर्थिक दुर्बलतेचे प्रतीक आहे. स्वत:ला वाळवंटात वाट चुकल्यासारखं भटकताना पाहणं हे भीषण आर्थिक नुकसान किंवा आर्थिक अडचणी वाढण्याचे संकेत आहेत.
advertisement
6/6
जुगार किंवा पैशाच्या खेळात हरणे - स्वप्नात तुम्ही स्वतःला जुगार खेळताना पाहिलं तर तो आर्थिक नुकसानीचा संकेत मानला जातो. त्याचप्रमाणे, स्वप्नात कोणत्याही प्रकारच्या पैशाच्या खेळात हरणे हे देखील आर्थिक नुकसान किंवा भविष्यात धोकादायक परिस्थितीचा संकेत मानला जातो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Swapna Shastra: स्वप्नात पाहिलेल्या या गोष्टी म्हणजे आर्थिक संकटाचा संकेत! मग कितीही स्टेबल असाल