Astrology: प्रतिकूल परिस्थितीतूनही वाट काढली! या 5 राशींचे आता नशीब चमकणार; हाताला यश येतंय
- Written by:Chirag Daruwalla
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, December 21, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशीभविष्य सांगितलं जातं. ग्रहस्थितीनुसार राशींवर कसा परिणाम असेल, ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
advertisement
1/12

मेषआजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी एकदम छान आहे. आज तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा जाणवेल, ज्यामुळे लोकांशी सहज जुळून येता येईल. मनातले विचार आणि भावना तुम्ही मोकळेपणाने मांडू शकाल, त्यामुळे नाती अजून घट्ट होतील. आज आत्मविश्वास आणि सकारात्मकता भरपूर असेल. मित्रपरिवार आणि आप्तेष्टांसोबत छान वेळ जाईल. भावनिक जवळीक वाढवण्यासाठी हा दिवस योग्य आहे. मनाचं ऐका आणि ज्या नात्याला महत्त्व आहे ते अजून मजबूत करण्याचा प्रयत्न करा. तुमचे गुण आणि खास प्रतिभा आज फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या जवळच्या लोकांसाठीही आनंद देणारी ठरेल. एकूणच आजचा दिवस नात्यांमध्ये गोडवा आणणारा आहे.लकी अंक: 7 लकी रंग: जांभळा
advertisement
2/12
वृषभआजचा दिवस थोडा बदलांचा आणि आव्हानांचा आहे. आजूबाजूची परिस्थिती थोडी प्रतिकूल वाटू शकते. सामाजिक आयुष्यात काही गोंधळ जाणवू शकतो, त्यामुळे अस्वस्थता येऊ शकते. अशा वेळी नात्यांमध्ये संवाद वाढवणं खूप गरजेचं आहे. मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे बोललात तर बराच ताण कमी होईल. मन जरा जास्त संवेदनशील असेल, त्यामुळे संयम ठेवा. हा काळ थोडा कठीण असला तरी योग्य समजूतदारपणाने तुम्ही सगळं सांभाळू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा आणि भावना व्यक्त करायला घाबरू नका. शेवटी हा अनुभव नाती मजबूत करणारा ठरेल.लकी अंक: 6 लकी रंग: पिवळा
advertisement
3/12
मिथुनमिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूपच उत्साही आणि सकारात्मक आहे. आज तुमचं व्यक्तिमत्त्व खास आकर्षक वाटेल. लोकांशी पटकन जुळून याल आणि नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. तुमचं बोलणं आणि विचारांची स्पष्टता आज सगळ्यांवर छाप पाडेल. नवीन नातं सुरू करायचं असेल किंवा जुनं नातं अजून मजबूत करायचं असेल, तर आजचा दिवस उत्तम आहे. संवाद, समजूतदारपणा आणि आपुलकी यामुळे आज नात्यांमध्ये गोडवा वाढेल. मन प्रसन्न राहील आणि दिवस आनंदात जाईल.लकी अंक: 2 लकी रंग: गुलाबी
advertisement
4/12
कर्कआजचा दिवस कर्क राशीसाठी थोडासा कठीण वाटू शकतो. गोष्टी मनासारख्या होत नाहीत असं जाणवेल. भावनिकदृष्ट्या थोडं अस्थिर वाटण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे बोलताना जपून बोला. शब्दांचा चुकीचा अर्थ निघू शकतो. कुटुंबीयांशी संवाद करताना संयम ठेवा. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तरी निराश होऊ नका, ही परिस्थिती तात्पुरती आहे. धीर धरला तर या अनुभवातून शिकायला मिळेल आणि पुढे नात्यांमध्ये स्थिरता येईल.लकी अंक: 5 लकी रंग: नारंगी
advertisement
5/12
सिंहसिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एकदम मस्त आहे. आत्मविश्वास आणि सकारात्मकता तुमची ताकद ठरेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. आज मनातलं स्पष्ट बोलाल, त्यामुळे नाती अजून घट्ट होतील. प्रिय व्यक्ती, मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळेल. सर्जनशीलतेला चांगला वाव मिळेल आणि नवीन कल्पना सुचतील. संधी भरपूर मिळतील, फक्त त्याचा योग्य वापर करा. आजचा दिवस आनंद देणारा ठरेल.लकी अंक: 10 लकी रंग: निळा
advertisement
6/12
कन्याआज तुमच्या नात्यांमध्ये थोडी उलथापालथ जाणवू शकते. भावना जरा जास्त तीव्र असतील, त्यामुळे छोट्या गोष्टींवर प्रतिक्रिया येऊ शकते. अशा वेळी समोरच्याला समजून घेणं आणि स्वतःला नीट व्यक्त करणं गरजेचं आहे. वाद झाला तर शांतपणे हाताळा. संवाद ठेवलात तर नाती अधिक मजबूत होतील. हा दिवस नात्यांमध्ये संतुलन आणण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. थोडा संयम ठेवा, सगळं सुरळीत होईल.लकी अंक: 4 लकी रंग: आकाशी निळा
advertisement
7/12
तूळआजचा दिवस थोडासा गुंतागुंतीचा आहे. मनात तणाव आणि गोंधळ जाणवू शकतो. लहानसहान गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना विचार करा. संयम ठेवलात तर परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. आज आत्मचिंतन करणं फायदेशीर ठरेल. जरी दिवस थकवणारा असला तरी यातून पुढच्या काळासाठी नवी दिशा मिळू शकते.लकी अंक: 11 लकी रंग: नेव्ही ब्लू
advertisement
8/12
वृश्चिकवृश्चिक राशीसाठी आजचा दिवस खूपच सकारात्मक आहे. लोकांशी भावनिक पातळीवर चांगला कनेक्शन जाणवेल. मनातलं मोकळेपणाने व्यक्त करू शकाल. जोडीदारासोबत किंवा प्रिय व्यक्तीसोबत छान वेळ जाईल. नात्यांमध्ये गोडवा आणि उत्साह वाढेल. सिंगल असाल तर एखादी खास भेट होण्याची शक्यता आहे. आज बोललेले शब्द परिणामकारक ठरतील. एकूणच समाधान देणारा दिवस आहे.लकी अंक: 1 लकी रंग: हिरवा
advertisement
9/12
धनुधनु राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक आणि समाधान देणारा आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवायला मिळेल. नात्यांमध्ये सुसंवाद जाणवेल. काहीतरी नवीन शिकायची किंवा अनुभवायची इच्छा वाढेल. भावना मोकळेपणाने व्यक्त केल्यामुळे नाती अजून मजबूत होतील. एकमेकांना साथ देण्याचा संदेश आजच्या दिवसातून मिळेल.लकी अंक: 3 लकी रंग: गडद हिरवा
advertisement
10/12
मकरमकर राशीसाठी आजचा दिवस थोडा आव्हानात्मक आहे. मानसिक ताण जाणवू शकतो. नात्यांमध्ये थोडा तणाव येण्याची शक्यता आहे. मनातले विचार नीट व्यक्त होत नाहीत असं वाटेल. अशा वेळी शांत राहणं आणि अनावश्यक वाद टाळणं महत्त्वाचं आहे. स्वतःकडे लक्ष द्या, ध्यान, योग किंवा आवडत्या गोष्टीत वेळ घालवा. संयम ठेवलात तर हळूहळू सगळं सुरळीत होईल.लकी अंक: 9 लकी रंग: काळा
advertisement
11/12
कुंभकुंभ राशीसाठी आजचा दिवस थोडासा कठीण वाटू शकतो. ऊर्जा कमी असल्यासारखं जाणवेल आणि मनात खूप विचार असतील. नात्यांमध्ये गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे बोलताना जपून बोला. छोट्या गोष्टी मोठ्या वादात बदलू शकतात. थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि मन शांत करा. आत्मचिंतन केल्यामुळे पुढचा मार्ग स्पष्ट होईल.लकी अंक: 8 लकी रंग: लाल
advertisement
12/12
मीनमीन राशीसाठी आजचा दिवस खूपच छान आहे. नवीन संधी आणि सकारात्मक अनुभव मिळतील. संवाद कौशल्य उत्तम राहील. प्रियजनांशी भावनिक पातळीवर चांगली जवळीक वाढेल. तुमचा संवेदनशील स्वभाव आज सगळ्यांना आधार देणारा ठरेल. जुने मतभेद मिटवण्यासाठीही आजचा दिवस चांगला आहे. मनाचं ऐका आणि या सकारात्मक उर्जेचा फायदा घ्या.लकी अंक: 5 लकी रंग: पांढरा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: प्रतिकूल परिस्थितीतूनही वाट काढली! या 5 राशींचे आता नशीब चमकणार; हाताला यश येतंय