Today Rashibhvishya: या राशींनी आज महत्त्वाच्या वस्तू सांभाळा, वाहन जपून चालवा; पहा दैनिक राशीभविष्य
- Published by:Ramesh Patil
- Written by:Rutuparna Mujumdar
Last Updated:
Today Rashibhvishya: आज दिनांक 1 डिसेंबर 2023, वार शुक्रवार. आज कार्तिक कृष्ण चतुर्थी. आज चंद्र मिथुन राशीत भ्रमण करीत आहे. श्रीगणरायाला वंदन करून पाहूया आजचे 12 राशींचे राशीभविष्य.
advertisement
1/12

मेष - चंद्र भ्रमण आज तृतीयस्थानात असून मानसिक स्थैर्य लाभेल. भावंडाना लाभदायक असून कौटुंबिक संबंध वाढवेल. मातृभेट होईल. धार्मिकदृष्ट्या मध्यम फळ देईल. दिवस चांगला.
advertisement
2/12
वृषभ - आज धनस्थानात चंद्र योग आहे. ठरविलेले काम नीट होईल. प्रवास जपून करा. वैवाहिक जीवनात सांभाळून रहा. संतती संबंधी आणि घरात अडचणी आल्या तरी यश मिळेल. अर्थिक अडचणींवर मात कराल. दिवस उत्तम.
advertisement
3/12
मिथुन - राशी स्थानातील चंद्र शुभ वर्तमान आणेल. भाग्यात शनि आहे. मंगळ प्रकृती चिंता लावेल. वाहन घेण्याचे ठरेल. शुक्र संततीला लाभ देईल. वैवाहिक जीवनात जबाबदारी येईल. दिवस मध्यम.
advertisement
4/12
कर्क - कुटुंबात ताण असले तरी तुमचे निर्णय घ्या. कायद्याचे पालन करा. आरोग्य जपा असे ग्रह सांगत आहेत. वैवाहिक सुख मिळेल तसेच प्रवास आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडाल. दिवस मध्यम.
advertisement
5/12
सिंह - मानसिक ताणतणाव होऊ शकतो. भाग्य स्थानातील ग्रहयोग धार्मिक बाबीत आस्था निर्माण करेल. वयोवृद्ध मंडळींनी सावध रहा. प्रकृती जपा, लाभ स्थानातील चंद्र शैक्षणिक, व्यावसायिक जीवन, यासाठी उत्तम फळ देईल. दिवस उत्तम.
advertisement
6/12
कन्या - महत्त्वाच्या कामात व्यग्र रहाल. घरातील लोकांना खूश करण्यासाठी प्रयत्न कराल. चंद्र दशम स्थानात साधारण फळ देईल. जोडीदाराकडून फायदा होईल. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तणाव राहील. वैवाहिक जीवन मध्यम राहील. दिवस मध्यम.
advertisement
7/12
तूळ - ईश्वरी चिंतनात मन लीन होईल. कार्यालयात मन द्विधा करणारी बातमी मिळेल. खर्च आणि नुकसान त्रस्त करतील. प्रवास योग येतील. परदेशसंबंधी व्यवहारात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात समारंभ होतील. दिवस उत्तम.
advertisement
8/12
वृश्चिक - मनावरील ताण दुपारनंतर वाढेल. नवीन ओळख होईल. चंद्र अष्टम स्थानात अधिकारी वर्ग त्रास देईल. आर्थिक लाभ होतील. नाते संबंध जपा. आरोग्य ठीक राहणार नाही. दिवस मध्यम.
advertisement
9/12
धनु - रागावर ताबा ठेवा. वैवाहिक जीवनात कलह होण्याची शक्यता आहे. चंद्र घरात आर्थिक लाभ देईल. प्राप्ती होईल पण खर्चही होईल. कार्यालयीन कामकाज सुरू राहील. प्रवासात जास्त दगदग टाळा. दिवस मध्यम.
advertisement
10/12
मकर - कुटुंबात चांगले वातावरण राहील. चांगली बातमी मिळेल. धंदा वाढेल. महत्त्वाचे काम टाळण्याचा प्रयत्न करा. षष्ठ चंद्र आहे. खर्च होईल पण समाधानी वाटेल. परदेश प्रवास योग येतील. दिवस मध्यम.
advertisement
11/12
कुंभ - आज प्रकृतीविषयी समस्या असतील तर सोडवण्यात वेळ लागेल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. वाहन जपून चालवा. प्रवास योग येतील. आर्थिक लाभ होतील. संततीला वेळ द्या. दिवस मध्यम.
advertisement
12/12
मीन - कुटुंबात महत्त्वाची घडामोड होईल. गृह सौख्य मिळेल. वैवाहिक जीवन ठीक राहील. आर्थिकदृष्ट्या ठीक असून संतती जपा. चतुर्थ स्थानात चंद्र आहे. नोकरीमध्ये जपून रहा. प्रवासात वेळ जाईल. दिवस चांगला.शुभम भवतू!!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Today Rashibhvishya: या राशींनी आज महत्त्वाच्या वस्तू सांभाळा, वाहन जपून चालवा; पहा दैनिक राशीभविष्य