TRENDING:

Today Rashibhvishya: गुरू-चंद्र गजकेसरी योग कोणाला लाभेल? असं आहे आजचं दैनिक राशीभविष्य

Last Updated:
Today Rashibhvishya: आज दिनांक 25 नोव्हेंबर 2023. शनिवार आज कार्तिक शुक्ल त्रयोदशी. चंद्र आज मेष राशीत भ्रमण करेल. गुरू चंद्र गजकेसरी योग बनेल. ईश्वर चरणी वंदन करून आजचा दिवस कसा जाईल बघुया.
advertisement
1/12
गुरू-चंद्र गजकेसरी योग कोणाला लाभेल? असं आहे आजचं दैनिक राशीभविष्य
मेष - आज राशी स्थानात चंद्र गुरू आहे. बंधुभेट होईल. सार्वजनिक कार्यात भाग घ्याल. तसेच राशीस्थानातील गुरू प्रतिष्ठा वाढवेल. जीवनात गोडी निर्माण करेल. वैवाहिक सुखाचा दिवस.
advertisement
2/12
वृषभ - घरात महत्त्वाचे निर्णय घ्याल. व्यय स्थानातील चंद्र गुरू सामाजिक संपर्क घडवेल. आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मध्यम फळ देईल. मंगल कार्याला शुभ संकेत देत आहे. वैवाहिक जीवन बरे जाईल. दिवस मध्यम.
advertisement
3/12
मिथुन - लाभ स्थानातील चंद्राचे भ्रमण नोकरीच्या ठिकाणी उत्तम लाभ देईल. संततीसुख मिळेल. तसेच वैवाहिकदृष्ट्या उत्तम दिवस असून आज गुंतवणूक करा. दिवस उत्तम.
advertisement
4/12
कर्क - चंद्र भ्रमण दशमस्थानातून होत आहे. घरामध्ये पाहुणे येतील. आर्थिकदृष्टया बरा दिवस. जास्त काळ कार्यात घालवाल. प्रकृतीला जपा. रवि सामाजिक लाभ देईल. दिवस मध्यम.
advertisement
5/12
सिंह - आज राशी स्वामी रवि तृतीय स्थानात आहे. अधिकारी व्यक्तींशी संबंध येईल. चंद्र गुरू भाग्य स्थानात सामाजिक क्षेत्रात आणि आर्थिकदृष्ट्या विशेष घटना घडवेल. लाभ होतील. धार्मिक स्थळांना भेट असा योग आणेल. दिवस मध्यम.
advertisement
6/12
कन्या - तृतीय स्थानात प्रवेश केलेला मंगळ व अष्टम चंद्र कौटुंबिक आणि आर्थिकदृष्ट्या अचानक फळ देईल. खर्च वाढ करेल. वैवाहिक जीवन बरे राहील. जोडीने घरासाठी खरेदी कराल. अष्टमातील ग्रह प्रकृती जपा, असे सांगत आहे. दिवस बरा.
advertisement
7/12
तूळ - धनस्थानात मंगळ आर्थिक, नोकरीसंबंधी अडचणी आणेल. कुटुंबाचे सुख मिळेल. सामाजिक घटना घडतील. चंद्र गुरू थोडा मानसिक ताण निर्माण करेल. शनी संततीकडे लक्ष द्या, असे सांगत आहे. दिवस उत्तम.
advertisement
8/12
वृश्चिक - चंद्र व्यावसायिक, मानसिक, आर्थिक लाभ देईल. रवि संतती आणि शिक्षण यासाठी उत्तम आहे. प्रवास जपून करा. परिस्थितीचे भान ठेवा. घरामध्ये जास्ती काम पडेल. नोकरीमध्ये संधी, वैवाहिकदृष्ट्या दिवस मध्यम.
advertisement
9/12
धनू - आर्थिक बाजू समाधानी असेल तरी मन व्यग्र राहील. शुक्र मंगळ भ्रमण खर्चिक अनुभव देईल. जोडीदार आणि मित्र मंडळी सोबत कलह होईल. संततीची काळजी घ्या. दिवस मध्यम.
advertisement
10/12
मकर - रवि धर्म आणि संस्कृतीबद्दल आस्था देईल. जोडीदाराला यश देईल. पोटाची काळजी घ्या. मातृपितृ चिंता निर्माण होईल. तसेच वरिष्ठांशी मतभेद संभवतात. आज चंद्र जीवनाची दिशा निश्चित करेल. प्रवास संभवतात. दिवस कामकाज करण्यात घालवाल.
advertisement
11/12
कुंभ - लाभ स्थानातील चंद्र गुरू कुटुंबविषयी समाचार देईल. आर्थिक लाभ होईल. सरकार दरबारी असलेली कामे होतील. राशी स्थानातील शनी मानसिक विरक्त वृत्तीचा अनुभव देईल. ईश कृपेने दिवस बरा जाईल.
advertisement
12/12
मीन - चंद्र जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या, असे सांगत आहे. सरकारी कामे, वरिष्ठ भेट होईल. अष्टम केतू कमरेचे त्रास निर्माण करील. चंद्र सामाजिक, व्यावसायिक जीवनात लाभ देईल. गृहसौख्य मिळेल. आर्थिकदृष्ट्या दिवस शुभ.शुभम भवतू !!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Today Rashibhvishya: गुरू-चंद्र गजकेसरी योग कोणाला लाभेल? असं आहे आजचं दैनिक राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल