Today Rashibhvishya: या राशींनी आज नकारात्मक व्यक्ती आणि विचार दूर ठेवा, पहा दैनिक राशीभविष्य
- Published by:Ramesh Patil
- Written by:Rutuparna Mujumdar
Last Updated:
Today Rashibhvishya: आज दिनांक 28 नोव्हेंबर 2023, मंगळवार. कार्तिक कृष्ण प्रतिपदा. चंद्र आज वृषभ राशीतून भ्रमण करेल. श्री गणेशस्मरण करून पाहुया आजचे 12 राशींचे राशीभविष्य.
advertisement
1/12

मेष - आज धनस्थानातील चंद्र अनेक सुखद घटना घडवेल.आर्थिक लाभ झाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. नकारात्मक विचारांना दूर ठेवा. जास्तीचे काम काढून घराची सजावट करण्याकडे कल राहील. पूजा, धार्मिक कार्य घडेल. प्रवास टाळा. दिवस शुभ.
advertisement
2/12
वृषभ - राशीतील चंद्र आणि व्यय गुरू परदेश संबंधी घडामोडी करीत आहे. धार्मिक बाबीमध्ये, घरात खर्चिक अनुभव येतील. दशम शनि नोकरीत जपून राहण्याचे संकेत देत आहे. प्रवास योग येतील. चांगले फळ देणारा असा हा दिवस आहे.
advertisement
3/12
मिथुन - आज व्यय चंद्र व्यावसायिक आणि कौटुंबिकदृष्ट्या मध्यम फळ देईल. जबाबदाऱ्या पूर्ण कराल. रवि कायदा न मोडण्याचे संकेत देत आहेत. काही त्रास होऊ शकतो. काळजी घ्या. दिवस बरा.
advertisement
4/12
कर्क - गुरू दशम स्थानात असून नोकरीत बदल देईल. कामात पारदर्शकता येईल. सांसारिक जीवनात गोडी राहील. चंद्र प्रकृती उत्तम ठेवेल. नवीन व्यक्तींशी संपर्क होईल, दिवस जपून राहण्याचा आहे. मानसिक ताणामुळे थकू नका. उत्तम दिवस.
advertisement
5/12
सिंह - आज चंद्र दशम स्थानात असेल. अचानक नोकरीत जास्तीचे काम येईल. स्वतःमध्ये सुधारणा करा. चतुर्थ स्थानात ग्रह गृह, वाहन सौख्य देतील. आर्थिक लाभ होतील. खर्च टाळायचा प्रयत्न करा. घरामध्ये वेळ द्या. दिवस चांगला जाईल.
advertisement
6/12
कन्या - अष्टम स्थानातून गुरूभ्रमण कष्ट देणारे असून घरामध्ये घडामोडी दर्शवित आहे. भाग्य चंद्र आहे. मित्र मैत्रिणीसोबत दिवस व्यतीत करा. आनंदात रहा. घरात जास्तीचे खर्च होतील. जोडीदाराला लाभ देखील होतील. दिवस उत्तम.
advertisement
7/12
तूळ - आज दिवस पाहुणे मंडळींची भेट, समारंभ, प्रवास अशा बाबींमध्ये यश देईल. नवीन व्यक्तीची ओळख होईल. प्रवास योग येतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कार्यालयात जास्तीचे काम पडेल. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस मध्यम.
advertisement
8/12
वृश्चिक - सप्तम स्थानातील चंद्र वैवाहिकदृष्ट्या शुभ आणि घरासंबंधी काही निर्णय घेण्यास योग्य आहे. भावंडाना शुभ. व्यवसाय नोकरीत व्यय शुक्र ताण देईल. जास्त खर्च होईल. दिवस चांगला.
advertisement
9/12
धनु - आज दिवस घरगुती कामात जाईल. मन रमेल. संततीचे आरोग्य सांभाळा. नकारात्मक व्यक्ती आणि विचार दूर ठेवा. कार्य करण्यासाठी प्रवृत्त व्हाल. जोडीदाराची चिंता वाटेल. आर्थिकदृष्ट्या दिवस बरा आहे.
advertisement
10/12
मकर - कौटुंबिक जीवन आणि संतती यांची काळजी घेण्याचा आज दिवस आहे. नोकरीसाठी प्रवास करताना जपून राहा. आरोग्य चिंता कमी होईल. संततीसाठी वेळ काढावा लागेल. आर्थिकदृष्ट्या एकूण दिवस बरा आहे.
advertisement
11/12
कुंभ - राशी स्थानातील शनी भ्रमण आणि चतुर्थ चंद्र हे काही व्यक्तींपासून सावध राहा, असे आवाहन करीत आहे. प्रकृती उत्तम राहील. संततीशी कलह टाळा. वैवाहिक जीवनात कुरबुरी होतील. घरात कार्याचे योग येतील. गुरू साथ देईल. दिवस बरा.
advertisement
12/12
मीन - आज तृतीय चंद्र घरामध्ये आनंद निर्माण करेल. जबाबदारीमध्ये सहभागी व्हा, असे संकेत देत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या उत्तम दिवस. भावंड भेट होईल. शैक्षणिक लाभ होतील. प्रवासाचे योग. दिवस उत्तम.शुभम भवतू..
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Today Rashibhvishya: या राशींनी आज नकारात्मक व्यक्ती आणि विचार दूर ठेवा, पहा दैनिक राशीभविष्य