Astrology: खूप सोसलं! आता होईल सुखाची स्वप्नपूर्ती; या राशींचे नशीब उजळणार, राहु-केतू आले साथीला
- Published by:Ramesh Patil
- Written by:Pooja chandra
Last Updated:
Horoscope In Marathi : प्रेमजीवनात अनपेक्षित रोमान्स, आर्थिक स्थिरता, व्यावसायिक कामगिरी या गोष्टी महत्त्वाच्या असतील. तसंच नातेसंबंध जोपासणं, नवीन आव्हाने स्वीकारणं आणि स्वस्तःची काळजी घेणं या गोष्टींना प्राधान्य द्यावं लागेल. आपल्या राशीच्या चिन्हाच्या ऊर्जेशी कनेक्ट राहा. जीवनातील शुभ घटकांकडे लक्ष द्या. ज्या संधींची वाट पाहात आहात, त्या संधी मिळाल्या तर स्वीकार करा.
advertisement
1/12

मेष (Aries) : प्रेमजीवनाला आनंददायी वळण मिळू शकते. कारण एखाद्या व्यक्तीशी अनपेक्षित रोमँटिक भेट होऊ शकते. उत्स्फूर्त राहा. मनातले विचार ऐका. खंबीरपणा आणि उत्कटता हे दोन गुण तुमची ताकद ठरतील. प्रकल्पांची जबाबदारी घेतली तर त्यात उल्लेखनीय प्रगती करू शकाल. आर्थिक स्थिती आशादायक असेल. गुंतवणुकीच्या नवीन संधी आणि विकासासाठी वाटाघाटीचा पर्याय शोधा. मेहनतीचं फळ मिळेल. जवळच्या मित्रांसोबत सहलीचं नियोजन करा. ही सहल तुम्हाला नवचैतन्य देईल.LUCKY Crystal - CarnelianLUCKY Color - RedLUCKY Number - 79
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : जुन्या आठवणीत रमाल. जोडीदारासोबतचे काही रोमँटिक क्षण आठवतील. तुमच्या भावना ओळखा आणि त्यानुसार संवाद साधा. नातं मजबूत करणाऱ्या भावनिक बंधाचा आनंद घ्या. कौशल्य सुधारण्यावर आणि व्यावसायिक नेटवर्कचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करा. सहकार्याने केलेले प्रयत्न यशदायी ठरतील. आर्थिक स्थिरता तुमच्या आवाक्यात असेल. खर्च करताना सावधगिरी बाळगा. आकर्षक संधीचा फायदा घ्या. जवळच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवा. यातून आनंद आणि समर्थनाचा आवश्यक स्त्रोत मिळेल.LUCKY Crystal – Rose QuartzLUCKY Color - GreenLUCKY Number -66
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : तुमच्या मनातील आपुलकी व्यक्त करण्यासाठी दिवस योग्य आहे. मनापासून संवाद साधा आणि नातेसंबंध जोपासा. तीक्ष्ण बुध्दी आणि अनुकूलतेच्या जोरावर व्यावसायिक प्रयत्नांमध्ये यश मिळवाल. नवीन आव्हानं स्वीकारा आणि तुमचे अष्टपैलू कौशल्य दाखवा. आर्थिक परिस्थितीकडे लक्ष द्या. बजेटची काळजी घ्या आणि आवश्यक गोष्टींसाठी खर्च करा. अनपेक्षित आर्थिक संधींकडे लक्ष द्या. मनःशांती आणि नवचैतन्यासाठी एखाद्या लहान सहलीला जा. उत्साह वाढवणाऱ्या मित्रांमध्ये राहा.LUCKY Crystal – AmbarLUCKY Color - YellowLUCKY Number – 5
advertisement
4/12
कर्क (Cancer) : दिवस प्रेमजीवनात सुसंवाद आणि समजूतदारपणा आणेल. मनापासून संवाद साधत जोडीदारासोबतचे तुमचे भावनिक बंध अधिक घट्ट करा. कामाच्या पद्धतीवर विश्वास ठेवा. अंतर्ज्ञानी दृष्टिकोन सुरक्षित प्रगती आणि योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करेल. आर्थिक स्थिरता येईल. शिस्तबद्ध राहा. दीर्घकालीन संधींमध्ये गुंतवणूक करा. मेहनतीचे फळ मिळेल. प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवाल. मैत्री वाढवा. भावनिक आरोग्याला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टींवर भर द्या.LUCKY Crystal - OnyxLUCKY Color - SilverLUCKY Number – 12
advertisement
5/12
सिंह (Leo) : दिवस प्रेमजीवनात उत्साह आणि उत्कटता आणेल. नवीन गोष्टींसाठी खुली मानसिकता ठेवा. उत्स्फूर्त प्रेम करा. कामाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यास उत्सुक असाल. तसंच नेतृत्वाच्या संधीची प्रतीक्षा कराल. तुमचे कौशल्य दाखवा आणि आसपासच्या लोकांना प्रेरणा देऊन प्रकल्पांची जबाबदारी स्वीकारा. आर्थिक लाभ होऊ शकतात. कौशल्यं वाढवण्यावर आणि गुंतवणुकीचा आढावा घेण्याकडे लक्ष केंद्रित करा. प्रयत्नांचं चांगलं फळ मिळेल. जवळच्या मित्रांसह सहलीला जाण्याचं नियोजन करा. साहसी वृत्तीला वाव द्या. सकारात्मक आणि मौजमजेत राहा.LUCKY Crystal - SunstoneLUCKY Color - GoldLUCKY Number – 11
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आत्मनिरीक्षण आणि चिंतनासाठी दिवस योग्य आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. तुमच्या आशा आकांक्षाबाबत चर्चा करा आणि नातं मजबूत करा. कामात यश मिळवण्यासाठी बारकाव्यांकडे लक्ष द्या. काम उत्कृष्ट व्हावे यासाठी संघटना आणि कार्यक्षमतेवर भर द्या. आर्थिक स्थिरतेसाठी शिस्त पाळा. खर्चाचे मूल्यमापन करा. बचत आणि सुज्ञपणे गुंतवणुकीच्या संधी शोधा. स्वतःची काळजी घ्या आणि विश्रांतीसाठी वेळ द्या. मानसिक आणि शारीरिक आरोग्याला चालना देणाऱ्या गोष्टींमध्ये सहभागी व्हा.LUCKY Crystal – Lapis LazuliLUCKY Color – Navy BlueLUCKY Number – 44
advertisement
7/12
तूळ (Libra) : नातेसंबंधात सुसंवादी वातावरण असेल. मुक्त संवाद साधा आणि मुत्सद्देगिरीनं आपल्या भावना व्यक्त करा. कामात सहयोग ही यशाची गुरूकिल्ली असेल. सामूहिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सांघिक भावना स्वीकारा. सहकार्यांच्या क्षमतेचा पुरेपूर फायदा घ्या. आर्थिक विवेक गरजेचा आहे. बजेट संतुलित राहील यावर लक्ष केंद्रित करा. भावनेच्या भरात खर्च टाळा. स्थिर विकासाच्या संधी शोधा. अर्थपूर्ण संवाद आणि अनुभव शेअर करण्यातून मैत्री वाढवा. ऊर्जा मिळवण्यासाठी लहान सहलीची योजना आखा.LUCKY Crystal – Rose QuartzLUCKY Color – Pastel PinkLUCKY Number – 17
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : दिवस प्रेमजीवनात उत्कटता आणि तीव्रता आणेल. कक्षेबाहेर पडा आणि खोल बंधासाठी तुमचे मन खुले करा. दृढनिश्चय आणि लक्ष्याच्या जोरावर व्यावसायिक यश मिळवाल. अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा. तुमच्या ध्येयाशी सुसंगत संधीचा फायदा घ्या. आर्थिक स्थिरतेसाठी काळजीपूर्वक नियोजन करा. गुंतवणुकीचे पुनरावलोकन करा आणि दीर्घकालीन विकासाच्या धोरणांचा विचार करा. अर्थपूर्ण संवादामुळे मित्रांसोबतचे तुमचे नाते अधिक मजबूत होईल. आरोग्याला प्राधान्य द्या. मन आणि शरीराला पोषक गोष्टी करण्यावर भर द्या.LUCKY Crystal - GarnetLUCKY Color - BeigeLUCKY Number – 18
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : दिवस साहस आणि प्रेमाने भरलेला असेल. उत्स्फूर्तता स्वीकारा. तुमच्या मनाला नातेसंबंधाबाबत मार्गदर्शन करू द्या. तुमचा उत्साह आणि आशावाद आसपासच्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल. नवीन आव्हाने स्वीकारा. व्यवसायात जोखीम घ्या. आर्थिक विपुलता येऊ शकते. उत्पन्न वाढवण्यासाठी संधी शोधा. दीर्घकालीन नफ्यासाठी हुशारीने गुंतवणूक करा. नवीन ठिकाणी सहलीला जाण्याचे नियोजन आखा. मित्रांसह साहसी गोष्टींमध्ये सहभाग घ्या. नवीन शोधाचा आनंद मिळवा.LUCKY Crystal - GoldLUCKY Color – PurpleLUCKY Number – 13
advertisement
10/12
मकर (Capricorn) : दिवस नात्यात स्थिरता आणि वचनबध्दता आणेल. मजबूत पाया तयार करण्यावर आणि भावनिक पोषणाकडे लक्ष केंद्रित करा. शिस्तबद्ध दृष्टिकोनाच्या जोरावर व्यवसायात लक्षणीय प्रगती कराल. कार्यक्षमता आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. आर्थिक नियोजनाला महत्त्व द्या. संघटित राहा आणि शाश्वत विकासाच्या संधींचा विचार करा. जवळच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवा. संयमाचे चांगले फळ मिळेल. विश्रांती आणि आरोग्याला पूरक गोष्टींमध्ये व्यग्र राहा.LUCKY Crystal – Smoky QuartzLUCKY Color - GreyLUCKY Number – 19
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : नातेसंबंधात भावनिक वृद्धी आणि समजूतदारपणाची संधी मिळेल. मुक्त संवाद साधा. परस्परांचा आदर करा. नाविन्यपूर्ण कल्पना आणि दृष्टिकोनामुळे ऑफिसमध्ये वेगळे स्थान निर्माण कराल. आपले व्यक्तिमत्व स्वीकारा आणि आसपासच्या लोकांना प्रेरणा द्या. आर्थिक स्थिरतेसाठी काळजीपूर्वक नियोजन गरजेचे आहे. उत्पन्नात विविधता आणण्यासाठी संधी शोधा. तुमच्या आवडीनुसार विविध उपक्रमांमध्ये गुंतवणूक करा. समविचारी व्यक्तींशी संपर्क साधा आणि वैयक्तिक विकासाला पूरक मैत्री वाढवा. मानसिक आणि शारीरिक आरोग्याला पूरक गोष्टींना प्राधान्य द्या.LUCKY Crystal - AquamarineLUCKY Color - TurquoiseLUCKY Number – 21
advertisement
12/12
मीन (Pisces) : दिवस प्रेमजीवनात प्रेमळपणा वाढवणारा आहे. जोडीदाराशी तुमचं नातं अधिक दृढ करण्यासाठी तुमची सर्जनशीलता आणि भावना व्यक्त करा. तुमची अंतःप्रेरणा कामात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा. तुमच्या मूल्यांशी सुसंगत संधी स्वीकारा. आर्थिक बाबींकडे लक्ष द्या. बचत आणि जीवनातलं सुख यात समतोल साधा. विपुलता येण्यासाठी तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. मैत्री वाढवा. सकारात्मक प्रभाव असलेल्या ठिकाणी राहा. विश्रांती आणि आध्यात्मिक वाढीसाठी पूरक गोष्टींमध्ये व्यग्र राहा.LUCKY Crystal - AquamarineLUCKY Color - GreenLUCKY Number – 32
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: खूप सोसलं! आता होईल सुखाची स्वप्नपूर्ती; या राशींचे नशीब उजळणार, राहु-केतू आले साथीला