हवं ते मिळणार! शुक्राचा मकर राशीत प्रवेश, आजपासून 5 फेब्रुवारीपर्यंत 'या' 3 राशींच्या लोकांचा गोल्डन टाइम
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये सुख, सौंदर्य, प्रेम आणि ऐश्वर्याचा कारक मानला जाणारा 'शुक्र' ग्रह आज, 13 जानेवारी 2026 रोजी पहाटे 4 वाजून 2 मिनिटांनी शनीच्या 'मकर' राशीत प्रवेश करत आहे.
advertisement
1/5

ज्योतिषशास्त्रामध्ये सुख, सौंदर्य, प्रेम आणि ऐश्वर्याचा कारक मानला जाणारा 'शुक्र' ग्रह आज, 13 जानेवारी 2026 रोजी पहाटे 4 वाजून 2 मिनिटांनी शनीच्या 'मकर' राशीत प्रवेश करत आहे.
advertisement
2/5
शुक्र हा शनीचा मित्र ग्रह असून, मकर राशीतील त्याचे हे गोचर अनेक राशींसाठी भाग्योदयाचे ठरणार आहे. विशेषतः मेष, सिंह आणि मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ 'चांदीच चांदी' करणारा असेल.
advertisement
3/5
मेष: करिअरमध्ये मोठी झेप मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र दहाव्या स्थानी गोचर करत आहे. नोकरीत तुमची प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील, ज्यामुळे पदोन्नतीचे मार्ग मोकळे होतील. जे लोक फॅशन, मीडिया किंवा डिझाइनिंग क्षेत्रात आहेत, त्यांना मोठा आर्थिक लाभ होईल.
advertisement
4/5
सिंह: अचानक धनलाभ आणि सुख सिंह राशीच्या लोकांसाठी हे गोचर सहाव्या स्थानी होत असले तरी, ते तुम्हाला शत्रूंवर विजय मिळवून देईल. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळतील. नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुम्ही कौटुंबिक सुखसोयींवर खर्च कराल. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक पराभूत होतील.
advertisement
5/5
मकर: लग्नाचे योग आणि प्रगती शुक्र तुमच्याच राशीत प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होईल. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. व्यावसायिक दृष्टीने हा काळ प्रगतीचा असून, तुमच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होईल. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही कठीण कामे सहज पूर्ण कराल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
हवं ते मिळणार! शुक्राचा मकर राशीत प्रवेश, आजपासून 5 फेब्रुवारीपर्यंत 'या' 3 राशींच्या लोकांचा गोल्डन टाइम