Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ; महत्त्वाची चांगली बातमी अखेर..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीत लक्षणीय बदल होतील, ज्याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक परिस्थिती, करिअर, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनावर होईल. धनु राशीतील ग्रहांची भव्य युती आणि चंद्राचे विविध राशींमधून भ्रमण यामुळे अनेक शुभ राजयोग निर्माण होत आहेत. याचा मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींवरील साप्ताहिक परिणाम जाणून घेऊ.
advertisement
1/6

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल. या आठवड्यात पैशांची आवक कमी आणि खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायात चढ-उतारांना सामोरं जावं लागू शकतं. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास अपेक्षेपेक्षा कमी फळदायी ठरू शकतात. मात्र, हा व्यवसायाचा एक भाग आहे आणि ही परिस्थिती जास्त काळ टिकणार नाही. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसाय पुन्हा रुळावर येताना दिसेल. नोकरी करणाऱ्यांना आपलं काम वेळेत आणि चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याची गरज आहे.
advertisement
2/6
मेष - या आठवड्यात आरोग्य आणि नात्यांकडे विशेष लक्ष द्या. आठवड्याचा पूर्वार्ध नात्यांच्या बाबतीत थोडा प्रतिकूल असू शकतो. प्रियजनांशी मतभेद होऊ शकतात, पण उत्तरार्धात एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या मध्यस्थीमुळं गैरसमज दूर होतील. उत्तरार्धात कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय तुम्ही घेऊ शकता. प्रेमसंबंधांसाठी ही वेळ अनुकूल राहील.लकी रंग: निळा लकी अंक: 15
advertisement
3/6
वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात जीवनातील कोणत्याही क्षेत्रात मोठं पाऊल उचलण्यापूर्वी नीट विचार करणं योग्य ठरेल. घाईघाईत किंवा गोंधळलेल्या स्थितीत काम केल्यास मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागू शकतं. या आठवड्यात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल. आठवड्याच्या सुरुवातीला एखादी महत्त्वाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते, ज्यामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं. पूर्वार्धात नियोजित कामं संथ गतीने पूर्ण होतील आणि कामाच्या व्यापामुळं खूप धावपळ होईल. मेहनतीनुसार यश न मिळाल्यास थोडं नैराश्य येऊ शकतं. नोकरीत वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांशी चांगलं ताळमेळ राखणं हिताचं ठरेल. पैशांच्या व्यवहारात खूप सावधगिरी बाळगा आणि या आठवड्यात कोणालाही कर्ज देणं टाळा.लकी रंग: पिवळा लकी अंक: 5
advertisement
4/6
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा गेल्या आठवड्यापेक्षा अधिक शुभ आणि फायदेशीर आहे. आठवड्याच्या सुरुवातीला एखादी महत्त्वाची चांगली बातमी मिळू शकते. जमीन किंवा मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचा विचार करत असाल, तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. वडिलोपार्जित संपत्तीतील अडचणी दूर होतील. नोकरीत परिस्थिती अनुकूल राहील आणि उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील.
advertisement
5/6
मिथुन - बेरोजगारांना हवी तशी नोकरी मिळेल, तर नोकरीत असलेल्यांच्या बदली किंवा पदोन्नतीच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि नियोजित कामं वेळेवर पूर्ण होऊन नफा मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक सहलीचे किंवा पर्यटनाचे योग येतील. नात्यांच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत शुभ असेल. अविवाहितांचे विवाह जमू शकतात आणि जुनी प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.
advertisement
6/6
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र फळ देणारा ठरेल. या आठवड्यात जोखमीची कामं टाळावीत आणि आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवावं, कारण तुमचं वागणंच तुमच्या नफ्याला किंवा नुकसानाला कारणीभूत ठरेल. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी जुळवून घेणं योग्य राहील. ऑफिसमध्ये लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. कागदपत्रं वेळेवर पूर्ण करा, अन्यथा विनाकारण त्रास होऊ शकतो. नात्यांच्या बाबतीत आठवड्याची सुरुवात थोडी प्रतिकूल असू शकते. कोणाशीही वाद घालणं टाळा, नाहीतर जुनी नाती तुटू शकतात. प्रेमसंबंधात विनाकारण प्रदर्शन किंवा दिखावा करू नका, अन्यथा सामाजिक बदनामीला सामोरं जावं लागू शकतं.लकी रंग: तपकिरी लकी अंक: 4
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ; महत्त्वाची चांगली बातमी अखेर..