Weekly Love Rashi Bhavishya In Marathi: सहजीवनाबद्दलचं साप्ताहिक राशीभविष्य, या राशींना आठवडा गोडी-गुलाबीचा
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Weekly Love Horoscope in Marathi: आयुष्यात प्रेम महत्त्वाचे आहे. प्रियकर-प्रेयसी किंवा जोडीदार हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक असतो. त्याच्यासोबतचे आपले संबंध कसे राहतात, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024 या आठवड्याचे लव्ह राशीफळ जाणून घेऊ.
advertisement
1/12

मेष (Aries) : या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रेमजीवनाबद्दल थोडे अस्वस्थ आणि चिंतित असाल. कदाचित तुम्ही घराबाहेर अधिक वेळ असाल किंवा प्रवासात असाल. त्यामुळे अंतर वाढत आहे. या आठवड्यात संयमाने निर्णय घेणं फायद्याचं ठरेल. आळसामुळे तुम्ही प्रेमसंबंधाकडे पुरेसं लक्ष देऊ शकणार नाही.
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : या आठवड्यात संवादाद्वारे तुमचे प्रेमसंबंध अधिक दृढ होऊ शकतात. अन्यथा काही कारणांवरून मतभेद होऊ शकतात; मात्र हे तात्पुरतं असेल आणि नंतर तुमची लव्ह रिलेशनशिप पुन्हा चमकेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आणि प्रिय व्यक्तींच्या सहवासात वेळ आनंदात व्यतीत कराल. या वेळी एखादं सरप्राइज गिफ्टदेखील मिळू शकतं.
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : हा आठवडा तुमच्या प्रेमजीवनासाठी खूप चांगला आहे. परस्परांना समजून घेणं वाढेल आणि मन प्रसन्न राहील. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला प्रेमात शांतता मिळवण्याच्या अनेक संधी मिळतील. जीवनात चढ-उतार असतील; पण निष्काळजीपणा केला नाही, तर तुम्हाला उत्तम रिझल्ट्स मिळतील. तुमचं प्रेमजीवन अधिक रोमँटिक होईल.
advertisement
4/12
कर्क (Cancer) : या आठवड्यात प्रेमसंबंधांमध्ये अधिक ताकद जाणवेल. नवीन वर्षाची सुरुवात आनंद आणि शांतता घेऊन येईल. परस्परांबद्दलचं प्रेम अधिक दृढ होईल. रिलेशनशिपचा पाया मजबूत करण्यासाठी तयार असाल. जोडीदारासोबत चांगल्या ठिकाणी शिफ्ट होण्याचा निर्णयदेखील घेऊ शकता. आजोळकडच्या काही कौटुंबिक चिंता वाढू शकतात. त्यामुळे प्रेमजीवनात थोड्या समस्या येऊ शकतात.
advertisement
5/12
सिंह (Leo) : या आठवड्यात प्रेमजीवनात परस्परांविषयीच्या प्रेमात वाढ जाणवेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या प्रेमजीवनात खूप आनंदी असाल. या आठवड्यात लव्ह रिलेशनशिपमध्ये चांगला सुसंवाद निर्माण करू शकाल. आठवड्याच्या शेवटी जीवनात सुधारणा होईल.
advertisement
6/12
कन्या (Virgo) : या आठवड्यात प्रेमसंबंधात विशेष आनंद आणि समृद्धीचे योगायोग दिसत आहेत. जीवनात आनंदाची चाहूल लागेल. प्रेमजीवनात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदात वेळ व्यतीत कराल. या आठवड्यात तुमच्या रोमँटिक जीवनाबद्दल तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल. तुम्हाला जोडीदारासोबत शांततेत वेळ व्यतीत करायची इच्छा होईल किंवा तुम्ही एकत्र एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.
advertisement
7/12
तूळ (Libra) : या आठवड्यात प्रेमसंबंधांच्या बाबतीत विशेष आनंद आणि समृद्धीचे योग आहेत. जीवनात तुमचं लक्ष तुमच्या प्रेमजीवनावर असेल. हा आठवडा शुभ असेल आणि तुमच्यासाठी फलदायी ठरेल. तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधांत समाधानी असाल. सुसंवाद प्रस्थापित होईल. प्रेमजीवनात रोमँटिक काळ असेल.
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : या आठवड्यात रोमान्सचा प्रवेश होईल. जीवनात आनंद आणि समृद्धीचे योग आहेत. आठवड्याच्या उत्तरार्धात परस्परांविषयीचं प्रेम अधिक दृढ होईल. तुम्ही तुमच्या प्रेमजीवनात आनंदी असाल. आठवड्याच्या शेवटी प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदात वेळ व्यतीत कराल.
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : या आठवड्यात खूप उत्साह जाणवेल. परस्परांविषयीचं प्रेम वाढेल. तुम्ही तुमच्या प्रेमजीवनात खूप आनंदी असाल. काही जणांना विवाहाचे सुंदर योग आहेत. या आठवड्यात मुलांच्या आनंदाचाही अनुभव घेता येईल. हा आठवडा तुमच्या जीवनात नवीन सुरुवात करणारा आहे. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.
advertisement
10/12
मकर (Capricorn) : या आठवड्यात प्रेमात आनंद आणि समृद्धीचे शुभ योग आहेत. नवीन वर्षात प्रेमजीवनात रोमान्स उत्तमरीत्या प्रवेश करील. तुमच्या जोडीदारासोबत वेळ व्यतीत केल्याने जीवनात खूप शांतता मिळू शकते; मात्र परिस्थिती सर्वसाधारण राहील. कोणत्याही बाबीचा संवादातून निपटारा करणं चांगलं ठरेल.
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : या आठवड्यात लव्ह रिलेशनशिप्समध्ये आनंद मिळेल. संवादातून समस्या सोडवल्यास एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. या आठवड्यात तुम्ही एकतर्फी दृष्टिकोन घेऊन पुढे गेलात, तर समस्या वाढू शकतात. इतरांच्या मतांचा विचार करून पुढे जाणं योग्य ठरेल.
advertisement
12/12
मीन (Pisces) : या आठवड्यात कोणताही महत्त्वाचा निर्णय संयमाने घ्या. तरच शांतता मिळेल. आर्थिक विषयांवर तुमची चांगली पकड असल्यामुळे या आठवड्यात मतभेद होऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी एखाद्या बातमीमुळे तुम्ही दुःखी होऊ शकता. त्यामुळे प्रेमजीवनाकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ शकणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Love Rashi Bhavishya In Marathi: सहजीवनाबद्दलचं साप्ताहिक राशीभविष्य, या राशींना आठवडा गोडी-गुलाबीचा