Weekly Numerology: 1, 2, 3 आणि 4 मूलांकाचे साप्ताहिक अंकशास्त्र! माघ महिन्याची सुरुवात कोणासाठी लकी?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Ank Rashifal: माघ महिन्याची सुरुवात नवीन आठवड्यात होत आहे. तिसरा आठवडा अंकशास्त्राच्या दृष्टीने खास असणार आहे. ग्रहांची स्थिती, पंचग्रही योग यामुळे काही मूलांकाना या आठवड्यात लाभाच्या संधी मिळतील. ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार मूलांक 1 ते 4 असणाऱ्यांचे भविष्य जाणून घेऊया.
advertisement
1/6

अंक 1 (कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेले लोक) या आठवड्यात तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. लांब पल्ल्याचा प्रवास टाळावा आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय तपासणी करूनच बाहेर पडावे. नशिबाची साथ पूर्ण आठवडाभर राहील, पण कोणत्याही कामात घाई करू नका. गुंतवणूक करताना संयम ठेवा. कुटुंबात प्रेम आणि ताळमेळ वाढेल, एखादा संदेश आनंदाची बातमी घेऊन येईल. कार्यक्षेत्रात काही अडचणी येतील, पण तुम्ही त्या पार कराल. उच्च शिक्षणासाठी मेहनत वाढवावी लागेल.
advertisement
2/6
अंक 2 (कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक) आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा उत्तम आहे. तुम्ही कामाच्या उत्साहात असाल, मात्र फालतू गोष्टींवर वेळ वाया घालवू नका. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो, पण इतरांच्या अनावश्यक मागण्या पूर्ण करताना पैसा खर्च होईल; त्यामुळे वेळीच नकार द्यायला शिका.
advertisement
3/6
मूलांक 2 चे लोक कौटुंबिक हस्तक्षेपामुळे थोडे चिडचिडे होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कष्ट आणि रिझल्ट्स टीकाकारांना गप्प करेल. विद्यार्थी म्हणून तुमची प्रशंसा होईल, पण अहंकार मनात येऊ देऊ नका.
advertisement
4/6
अंक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले लोक) तुमच्या वर्तनातील बदलामुळे आरोग्यात सकारात्मकता येईल. खाण्यापिण्याचे नियोजन नीट केल्यास फायदा होईल. फिरायला जाण्यासाठी किंवा पैसे खर्च करण्यासाठी मन ओढ घेईल, पण नंतर पश्चात्ताप टाळण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात शांतता राहील, मात्र घरातील वस्तू हाताळताना काळजी घ्या. कामात काही योजना अयशस्वी वाटू शकतात, पण खचून जाऊ नका. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि महत्त्वाचे निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्या.
advertisement
5/6
अंक 4 (कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक) या आठवड्यात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक नियोजन केल्यास तुम्ही चांगली बचत करू शकाल. स्वतःच्या आरामापेक्षा कुटुंबाच्या गरजांना प्राधान्य द्या, यामुळे तुम्हाला घरातील परिस्थिती नीट समजेल.
advertisement
6/6
मूलांक 4 - अभ्यासात लक्ष विचलित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरेल. मित्रांच्या मदतीने अभ्यासातील अडथळे दूर होतील आणि एकाग्रता वाढेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Numerology: 1, 2, 3 आणि 4 मूलांकाचे साप्ताहिक अंकशास्त्र! माघ महिन्याची सुरुवात कोणासाठी लकी?