TRENDING:

मांगलिक असणं म्हणजे काय, का येतो लग्नात अडथळा? 'या' एका उपायाने बदलेल आयुष्य

Last Updated:
हिंदू ज्योतिषशास्त्रामध्ये विवाहांसाठी मांगलिक दोष हा एक महत्त्वाचा आणि अनेकदा चिंतेचा विषय ठरतो. एखाद्या व्यक्तीला मांगलिक आहे असे म्हटले जाते, तेव्हा त्यांच्या लग्नात अनेक अडथळे येतात किंवा वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते.
advertisement
1/7

2/7
'मांगलिक' असणे म्हणजे काय आणि त्यामुळे लग्नात खरंच अडथळा येतो का, याबद्दल अनेक गैरसमज समाजात प्रचलित आहेत. मांगलिक दोषाचा संबंध ग्रहांचा सेनापती मानला गेलेल्या मंगळ ग्रहाशी आहे. मंगळ हा ऊर्जा, आक्रमकता आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करतो.
advertisement
3/7
जर एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत मंगळ ग्रह लग्न पहिले, चौथे, सातवे, आठवे किंवा बारावे यापैकी कोणत्याही एका भावात स्थित असेल, तर त्या व्यक्तीला 'मांगलिक' किंवा 'मंगळ दोष' असलेला मानले जाते.
advertisement
4/7
मंगळ ग्रहाची ऊर्जा आक्रमक आणि उत्साही असते. जेव्हा हा ग्रह वरील विशिष्ट स्थानांवर असतो, तेव्हा तो व्यक्तीच्या स्वभाव, निर्णय आणि वैवाहिक जीवनावर तीव्र प्रभाव टाकतो.
advertisement
5/7
मांगलिक व्यक्तींमध्ये हट्टीपणा, राग आणि आक्रमकता जास्त असू शकते, ज्यामुळे जोडीदारासोबत ताळमेळ साधण्यात अडचण येते. वैवाहिक जीवनाचे स्थान किंवा आयुर्मानाचे स्थान प्रभावित झाल्यास नात्यात तणाव किंवा आरोग्य समस्या निर्माण होतात. त्यामुळे मांगलिक व्यक्तीचा विवाह दुसऱ्या मांगलिक व्यक्तीशीच करण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
6/7
मांगलिक व्यक्तीशीच विवाह: हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. मांगलिक व्यक्तीने दुसऱ्या मांगलिक व्यक्तीशी विवाह केल्यास दोघांचा मंगल दोष आपोआप शांत होतो.
advertisement
7/7
कुंभ विवाह: ज्योतिषीय नियमांनुसार, लग्नापूर्वी जो मांगलिक असेल वधू किंवा वराने कुंभाशी (मातीच्या भांड्याशी) किंवा पिंपळाच्या झाडाशी प्रतिकात्मक विवाह करण्याची परंपरा आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
मांगलिक असणं म्हणजे काय, का येतो लग्नात अडथळा? 'या' एका उपायाने बदलेल आयुष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल