Asthi Visarjan: अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशीच रक्षा विसर्जन का केलं जातं? हिंदू धार्मिक परंपरा काय
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Asthi Visarjan: हिंदू धर्मात अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीची राख नदीत विसर्जित करण्याची परंपरा आहे. प्रदूषण-पर्यावरणाचा विचार करून अलिकडे रक्षा आपला शेतामध्ये पसरण्याचा निर्णय काही सूज्ञ लोक घेतात. पण, अंत्यसंस्कारानंतर रक्षाविसर्जन तिसऱ्या दिवशीच केले जाते. यामागील कारण काय हे अनेकांना माहीत नाही.
advertisement
1/6

हिंदू धर्मातील १६ संस्कारांपैकी मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करणे हा अंतिम संस्कार आहे, ज्याला अंत्येष्टी संस्कार असेही म्हणतात. अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीची राख (रक्षा) विसर्जन करणे हा देखील एक महत्त्वाचा विधी आहे. यामुळे आत्म्याला शांती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
2/6
अस्थी विसर्जन म्हणजे मृत व्यक्तीच्या अस्थी आणि राखेचे पवित्र नदीत विसर्जन करणे. शास्त्रांमध्ये, अंत्यसंस्कारानंतर तीन दिवसांच्या आत राखेचे विसर्जन करणे योग्य असल्याचे मानले आहे.
advertisement
3/6
पण, अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशीच रक्षाविसर्जन का केले जाते? याविषयी गरुड पुराणातही माहिती आहे. अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या, सातव्या किंवा नवव्या दिवशी रक्षा गोळा करता येते.
advertisement
4/6
ज्योतिष तज्ज्ञांच्या मते अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन करणे सर्वात योग्य आहे. विधीपूर्वक रक्षाविसर्जन तीन दिवसांच्या आत होणं फायदेशीर आहे.
advertisement
5/6
कोणत्याही वाईट किंवा नकारात्मक शक्ती हाडांवर कब्जा करू नयेत, म्हणून हाडे तीन दिवसांच्या आत स्मशानभूमीतून काढून टाकण्याची परंपरा आहे. मानवी शरीर हे पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी आणि आकाश या तत्वांनी बनलेले आहे आणि अंत्यसंस्कारानंतर शरीर या पाच तत्वांमध्ये विलीन होते.
advertisement
6/6
अंत्यसंस्काराच्या तिसऱ्या दिवशी रक्षा मिश्रीत हाडे गोळा केली जातात आणि वाहत्या पाण्यात अर्पण केली जातात. राखेचे विसर्जन केल्यानंतर, मृत व्यक्ती या जगातून पूर्णपणे मुक्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Asthi Visarjan: अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशीच रक्षा विसर्जन का केलं जातं? हिंदू धार्मिक परंपरा काय