TRENDING:

Indina Railway : ट्रेन लेट झाली? मग काय करायचं, प्रत्येक प्रवाशाला माहित असावेत हे नियम

Last Updated:
अनेकदा ट्रेन उशिरा येण्याची समस्या उद्भवते आणि त्यामुळे प्रवाशांचा संपूर्ण शेड्यूल बिघडतो. अशावेळी अनेकांच्या मनात प्रश्न येतो की ट्रेन लेट झाल्यास रिफंड मिळतो का?
advertisement
1/7
ट्रेन लेट झाली? मग काय करायचं, प्रत्येक प्रवाशाला माहित असावेत हे नियम
भारतातील स्पर्धा परीक्षा असो वा सामान्य ज्ञान. भारतीय रेल्वेबद्दलची माहिती नेहमीच महत्त्वाची ठरते. रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या नेटवर्कपैकी एक असून दररोज लाखो प्रवासी तिच्यावर अवलंबून असतात. पण अनेकदा ट्रेन उशिरा येण्याची समस्या उद्भवते आणि त्यामुळे प्रवाशांचा संपूर्ण शेड्यूल बिघडतो. अशावेळी अनेकांच्या मनात प्रश्न येतो की ट्रेन लेट झाल्यास रिफंड मिळतो का?
advertisement
2/7
रेल्वेचा नियम काय सांगतो?भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, जर एखादी ट्रेन 3 तास किंवा त्याहून अधिक उशिरा असेल आणि प्रवाशाला प्रवास नको असेल, तर त्याला संपूर्ण तिकीटाचे पैसे परत मिळू शकतात. हा नियम प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी लागू करण्यात आला आहे.
advertisement
3/7
ऑनलाइन तिकीटसाठी रिफंड कसा मागायचा?IRCTC द्वारे बुक केलेल्या तिकिटासाठी "Ticket Deposit Receipt (TDR)" फाइल करावी लागते. प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:-आपल्या IRCTC अकाउंटमध्ये लॉगिन करा.-Booked Ticket History मध्ये जा.-"File TDR" हा पर्याय निवडा.-कारणामध्ये Train Late More Than 3 Hours हा पर्याय निवडा.-सबमिट केल्यानंतर रेल्वे तपासणी करून रिफंड मंजूर करते.
advertisement
4/7
काउंटर तिकीटसाठी काय नियम आहेत?जर तिकीट थेट स्टेशनवरून घेतले असेल, तर संबंधित स्टेशन मास्टर किंवा रिझर्वेशन काउंटरवर जाऊन फॉर्म भरावा लागतो. तपासणीनंतर प्रवाशाला रोख स्वरूपात किंवा बँक खात्यावर पैसे परत दिले जातात.
advertisement
5/7
पैसे किती दिवसांत परत मिळतात?साधारणतः ऑनलाइन तिकीटाचा रिफंड 7 ते 10 वर्किंग दिवसांत खात्यात जमा होतो. काउंटर तिकीटासाठीही तत्सम प्रक्रिया लागू आहे.
advertisement
6/7
हा नियम का महत्त्वाचा?ट्रेन उशिरा झाल्याने प्रवाशांचे नियोजन बिघडते. अशावेळी किमान आर्थिक तोटा होऊ नये म्हणून रेल्वेने हा नियम केला आहे. यामुळे प्रवाशांचा रेल्वेवरील विश्वास वाढतो.
advertisement
7/7
प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचनाट्रेन लेट असल्यास आणि प्रवास करायचा नसेल तर वेळेवर TDR फाइल करा.काउंटर तिकीट घेतल्यास, स्टेशनवर जाऊन अर्ज करावा लागतो.आंशिक प्रवास केला असल्यास, फक्त शिल्लक प्रवासाचे पैसे परत मिळतील.रेल्वेचा हा नियम प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Indina Railway : ट्रेन लेट झाली? मग काय करायचं, प्रत्येक प्रवाशाला माहित असावेत हे नियम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल