TRENDING:

दहावीनंतर बनवली पहिली भन्नाट बाईक, कोल्हापूरच्या तरुणाचा अनोखा STUDIO, काय आहे खास?

Last Updated:
कोल्हापूरच्या बाईकवेड्या तरुणाचे नाव आल्हाद देशपांडे असे आहे. नुकतंच त्याने बाईक डिझाईन आणि मॉडिफिकेशनसाठी एक शोरुम सुरू केलंय.
advertisement
1/7
दहावीनंतर बनवली भन्नाट बाईक, कोल्हापूरच्या तरुणाचा अनोखा STUDIO, काय आहे खास?
कोणत्याही ॲडव्हेंचर बाईकसाठी जादाचे बॉडी पार्ट्स हे हमखास लागतात. मात्र, बऱ्याचदा हे पार्ट्स एकतर मिळत नाहीत किंवा चांगल्या प्रतीचे नसतात. त्यामुळेच <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापूरच्या</a> एका तरुणाने यावर उपाय शोधून स्वतःचा एक बाईक मोडिफिकेशन स्टुडीओ सुरू केला आहे. विशेष म्हणजे या स्टुडीओमध्ये तो वेगवेगळ्या बाईकना बसणारे ॲसेसरिज आणि बॉडी पार्ट्स स्वतःच नव्याने डीझाईन करुन बनवतो.
advertisement
2/7
कोल्हापूरच्या बाईकवेड्या तरुणाचे नाव आल्हाद देशपांडे असे आहे. नुकतंच त्याने बाईक डिझाईन आणि मॉडिफिकेशनसाठी एक शोरुम सुरू केलंय. याच ठिकाणी बनवलेल्या बाईकच्या काही खास ॲसेसरीज देखील तो विकतो. खरंतर आल्हादला दहावीनंतरच बाईक मॉडिफिकेशन आणि रिस्टोरेशनमध्ये रुची होती. त्यामुळे पहिली बाईक त्याने स्वतः दहावीनंतरच बनवली होती.
advertisement
3/7
तसेच त्यानंतर त्याने जवळपास अजून 10-15 बाईक मॉडीफाय केल्या होत्या. बाईक रेस्टॉरेशनमध्येही माहिती घेऊन एक राजदूत गाडी रिस्टोर केली होती. इंजिन बंद पडलेली, बरेचसे पार्टस् नसलेली अशी ती गाडी पूर्णपणे भंगारमध्येच होती. पण रिस्टोरेशननंतर आता ती गाडी चालू स्थितीत आहे, असे आल्हाद सांगतो.
advertisement
4/7
आल्हाद आधी बाईक मॉडिफिकेशनचं काम घरातच करत होता. पुढे लोकांना आपलं काम दिसलं पाहिजे म्हणून एक डिझाईन स्टुडिओ सुरू करण्याची कल्पना आली. मात्र, फक्त एक डिजाईन स्टुडिओ न राखता एक डिटेलिंग स्टुडिओही त्याने बनवला. 2019 सालीच याची कल्पना डोक्यात होती. मात्र, 2020 साली कोरोना महामारी आणि इतर काही कारणांमुळे ती कल्पना सत्यात उतरवता आली नाही. पण शेवटी 2024 मध्ये नव्या जोमात या स्टुडिओची सुरुवात केल्याचे आल्हाद सांगतो.
advertisement
5/7
या स्टुडिओमध्ये दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे फोम वॉशिंग, पॉलिशिंग, सिरॅमिक कोटिंग, इंटिरियर डीप क्लीनिंग, पीपीएफ, इंजिन क्लिनिंग अशा अनेक सुविधा दिल्या जातात. बाईकसाठी लागणाऱ्या विविध ॲसेसरीज बनवण्यासाठी थ्रीडी प्रिंटरचा वापर केला जातो. स्वतः डिझाईन केलेले काही बाईकचे पार्ट्स या स्टुडिओमध्ये बसवले जातात. ते पार्ट्स बाईकवर टेस्ट करूनच मग ते लोकली बनवून घेतले जातात. हे पार्ट्स ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने विकले जातात, असे आल्हादने सांगितले.
advertisement
6/7
कोणत्याही ॲडव्हेंचर बाईकसाठी ॲसेसरीज बनवताना त्या बॉडी पार्टच्या डिझाईन वर विचार केला जातो. डिझाईन करताना तो पार्ट बाईकच्या बाहेर जाता कामा नये, तो बाईकला सुट झाला पाहिजे, याची काळजी घेतली जाते. त्यानंतर बाईकवरच त्या बॉडी पार्टसाठी मोजमाप करुन डिझाईन बनवली जाते. 3D प्रिंटर मशीनने तो पार्ट बनवला जातो. तयार पार्ट पुन्हा बाईकला बसवून टेस्टिंग केले जाते. त्यानंतर लेजर कटिंगमध्ये सेम पार्ट मेटलचा बनवला जातो, असेही आल्हादने सांगितले.
advertisement
7/7
एखादी बाईक पूर्ण कस्टमाईज करायची असेल तर साधारण 5 हजारांपासून ते 15 हजारांपर्यंत खर्च केला जातो. जर तयार असलेल्या ॲसेसरिज पैकी काही हवे असेल तर, 200 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत खर्च येतो. तर काही पार्ट 4500 रुपयांपर्यंत देखील आल्हादच्या स्टुडिओमध्ये आहेत. (साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
दहावीनंतर बनवली पहिली भन्नाट बाईक, कोल्हापूरच्या तरुणाचा अनोखा STUDIO, काय आहे खास?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल