Gautami patil: 'पाटलांचा गाडा त्याने घाटात केला...' गाण्यावर नाचणारी गौतमीच्या आलिशान SUV चे PHOTO समोर, इतकी आहे किंमत
- Published by:Sachin S
Last Updated:
स्टेज गाजवणारी नृत्यांगना गौतमी पाटील अपघात प्रकरणामुळे वादात अडकली आहे. गौतमीच्या मालकीच्या असलेल्या कारने पुण्यात एका कारला जोराची धडक दिली. ही कार जप्त करण्यात आले असून तिचे फोटो समोर आले आहे.
advertisement
1/6

स्टेज गाजवणारी नृत्यांगना गौतमी पाटील अपघात प्रकरणामुळे वादात अडकली आहे. गौतमीच्या मालकीच्या असलेल्या कारने पुण्यात एका कारला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला असून उपचार सुरू आहे. पण, रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी गौतमीवर गंभीर आरोप केले आहे. ज्या कारने रिक्षाला धडक दिली, ती जप्त करण्यात आले असून तिचे फोटो समोर आले आहे. ही कार दक्षिण कोरियन कंपनी किआ मोटर्सची ७ सीटर एमपीव्ही Carens आहे.
advertisement
2/6
पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात 30 सप्टेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला होता. गौतमी पाटीलच्या मालकीच्या असलेल्या कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाला धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे जखमी झाले होते.
advertisement
3/6
गौतमीच्या मालकीची असलेली Kia Carens ही एक ७ सीटर एमपीव्ही आहे. या किआ कारची किंमत 10 लाखांपासून सुरू होते. या किमतीत तुम्हाला या कारचा बेस व्हेरिएंट मिळेल. जर तुम्ही या कारचा टॉप व्हेरिएंट खरेदी केला तर तुम्हाला 20 लाख रुपये मोजावे लागेल.
advertisement
4/6
या कारमध्ये 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 157bhp पॉवर आणि 253Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय, 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 113bhp पॉवर आणि 143.8Nm टॉर्क जनरेट करते. तिसरा इंजिन ऑप्शन डिझेलमध्ये उपलब्ध आहे, 1.5 लिटर डिझेल इंजिन व्हेरिएंट 113bhp आणि 250Nm टॉर्क जनरेट करतो.
advertisement
5/6
या कारमध्ये 10.25 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल आणि 10.25 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले आहे. याशिवाय, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, रीडिझाइन केलेले एसी व्हेंट्स, ड्युअल पॅन पॅनोरॅमिक सनरूफ, फोर वे पॉवर अॅडजस्टेबल सीट्स, 8 स्पीकर बोस साउंड सिस्टम आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
advertisement
6/6
विशेष म्हणजे, Carens Clavis मध्ये ADAS Level 2 सह 20 ऑटोनोमस सेफ्टी फीचर्स दिले आहेत. याशिवाय, या कारच्या सर्व व्हेरिएंटमध्ये स्टँडर्ड 6 एअरबॅग्ज, ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर, 360 डिग्री कॅमेरा आणि स्मार्ट क्रूझ कंट्रोल यासारखे खास फीचर्स आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Gautami patil: 'पाटलांचा गाडा त्याने घाटात केला...' गाण्यावर नाचणारी गौतमीच्या आलिशान SUV चे PHOTO समोर, इतकी आहे किंमत