बाईकच्या टायरमध्ये हवा कमी किंवा जास्त असेल तर काय होईल? बरोबर Presure असणं का गरजेचं एकदा वाचा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एक छोटा आणि महत्त्वाचा भाग आपण बऱ्याचदा विसरतो. तो म्हणजे टायर प्रेशर. याने काय होतंय? असं म्हणत घाईच्या वेळी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. दिसायला क्षुल्लक असलेली ही गोष्ट प्रत्यक्षात बाईकच्या सेफ्टी, मायलेज आणि परफॉर्मन्सवर मोठा परिणाम करते.
advertisement
1/8

आपली बाईक रोज धावते, पण तिची काळजी किती वेळा घेतो आपण? सर्विसिंग, इंजिन ऑइल बदलणं, चेन ल्यूब्रिकेशन या गोष्टींना आपण नेहमी लक्ष देतो. पण एक छोटा आणि महत्त्वाचा भाग आपण बऱ्याचदा विसरतो. तो म्हणजे टायर प्रेशर. याने काय होतंय? असं म्हणत घाईच्या वेळी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. दिसायला क्षुल्लक असलेली ही गोष्ट प्रत्यक्षात बाईकच्या सेफ्टी, मायलेज आणि परफॉर्मन्सवर मोठा परिणाम करते.
advertisement
2/8
योग्य टायर प्रेशर ठेवल्याने राईड अधिक स्मूथ आणि सुरक्षित होते. इंजिनवरील ताण कमी होतो, ब्रेकिंग सुधारते आणि टायरचं आयुष्यही वाढतं. चला तर जाणून घेऊया योग्य टायर प्रेशर ठेवण्याचे 5 मोठे फायदे, जे तुमची राईड अधिक आरामदायक आणि किफायतशीर बनवतात.
advertisement
3/8
1. योग्य टायर प्रेशर वाढवतं बाईकचं मायलेजबाईकचा मायलेज वाढवायचा असेल, तर टायर प्रेशरकडे दुर्लक्ष करू नका. टायरमधली हवा कमी असेल, तर टायर आणि रस्त्याचा संपर्क क्षेत्र (Contact Patch) वाढतो. त्यामुळे इंजिनला बाईक पुढे ढकलण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते, आणि त्यामुळे फ्युएलचा वापर वाढतो. उलट, जर टायरमध्ये हवा जास्त असेल, तर बाईक अस्थिर (unstable) होते आणि राईड असुरक्षित होते. त्यामुळे योग्य हवा गाडीत असणं गरजेचं आहे.
advertisement
4/8
2. रस्त्यावर मिळते उत्तम ग्रिपयोग्य टायर प्रेशर असणं म्हणजे बाईकची ग्रिप मजबूत असणं. पावसात, निरसड्या रस्त्यावर किंवा खडबडीत रस्त्यांवर संतुलित हवा असलेले टायर रस्त्याला घट्ट पकडतात. हवा कमी असेल, तर टायर फ्लॅट होतात आणि स्लिप होण्याचा धोका वाढतो. हवा जास्त असेल, तर टायर रस्त्याशी योग्य संपर्क ठेवू शकत नाहीत. त्यामुळे योग्य हवेचं प्रमाण नेहमी राखणं गरजेचं आहे.
advertisement
5/8
3. ब्रेकिंग होते अधिक परिणामकारकबाईकचं ब्रेकिंग सिस्टम योग्यरीत्या काम करावं, यासाठी टायर प्रेशरचा मोठा वाटा असतो. हवा योग्य प्रमाणात असेल, तर ब्रेक लावताना टायर रस्त्यावर घट्ट पकड ठेवतात आणि बाईक लगेच थांबते. हवा कमी किंवा जास्त असेल, तर ग्रिप सैल होते आणि इमरजन्सी ब्रेकिंगच्या वेळी बाईक घसरू शकते.
advertisement
6/8
4. टायरचं आयुष्य वाढतंटायर लवकर झिजू नयेत असं वाटतंय? मग हवा नियमित तपासा. हवा कमी असेल, तर टायरचा बाहेरील भाग जास्त घासला जातो. हवा जास्त असेल, तर मधला भाग पटकन झिजतो. योग्य प्रेशर ठेवल्यास टायर समान प्रमाणात झिजतात आणि त्यांचं आयुष्य वाढतं. यामुळे टायर वारंवार बदलण्याची गरज राहत नाही आणि खर्चही वाचतो.
advertisement
7/8
5. पंक्चरचा धोका कमी होतोयोग्य टायर प्रेशर ठेवल्यास पंक्चर होण्याचा धोका कमी होतो. कमी प्रेशरमुळे टायर खडबडीत रस्त्यांवर जास्त दाबले जातात आणि सहज छिद्र पडू शकतात. नियमित प्रेशर तपासल्याने हळूहळू हवा कमी होण्याच्या समस्येचं वेळेवर निदान करता येतं आणि तुम्ही रस्त्यात अडकण्यापासून वाचता.
advertisement
8/8
थोडक्यात सांगायचं झालं, तर योग्य टायर प्रेशर ही बाईकची “लपलेली सुरक्षा कवच” आहे. ही छोटीशी काळजी घेतली, तर तुमची राईड सुरक्षित, स्मूथ आणि किफायतशीर बनेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
बाईकच्या टायरमध्ये हवा कमी किंवा जास्त असेल तर काय होईल? बरोबर Presure असणं का गरजेचं एकदा वाचा