मर्सिडिजसारखे फिचर्स, टँकसारखी कडक, बजेट फ्रेंडली SUV साठी लोकांच्या रांगा, किंमतही कमी!
- Published by:sachin Salve
Last Updated:
भारतात सध्या एकापेक्षा एक स्वस्तात मस्त अशा SUV बजेटमध्ये उपलब्ध आहे. अलीकडे महिंद्राने आपली XUV 3XO ही एसयूव्ही लाँच केली.
advertisement
1/7

जर तुम्ही एखादी छोटी कार वापरत असला आणि SUV विकत घेण्याचा प्लॅन असेल तर ती वेळ आली आहे असं समजा. कारण भारतात सध्या एकापेक्षा एक स्वस्तात मस्त अशा SUV बजेटमध्ये उपलब्ध आहे. अलीकडे महिंद्राने आपली XUV 3XO ही एसयूव्ही लाँच केली होती. मागील काही दिवसांमध्ये या एसयूव्हीच्या विक्रीमध्ये तुफान वाढ झाली आहे. त्यामुळे महिंद्रा कंपनीला ही एसयुव्ही डिलिव्हरी करण्यासाठी ८ आठवडे अर्थात २ महिन्यांपर्यंत वेटिंग लागत आहे.
advertisement
2/7
महिंद्रा XUV 3XO एकूण 9 व्हेरिएंट्समध्ये येते. यामध्ये MX1, MX2, MX2 PRO, MX3, MX3 PRO, AX5, AX5L, AX7 आणि AX7L असे 9 व्हेरिएंट आहे. पण जर या व्हेरिएंटमध्ये किंवा तुमच्या आवडत्या रंगामध्ये ही एसयुव्ही उपलब्ध नसेल तर एखाद्यावेळेस तुम्हाला डिलिव्हरी मिळूनही जाईल. पण संपूर्ण फिचर्ससह जर XUV 3XOहवी असेल तर तुम्हाला थोडावेळ वाट पाहावी लागेल.
advertisement
3/7
XUV 3XO मध्ये ADAS, डिजिटल कॉकपिट, या सेगमेंटमध्ये सगळे आधुनिक फिचर्स आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे दमदार इंजिनसह किंमत कमी असल्यामुळे लोकांची पसंती या एसयुव्हीला मिळत आहे. xuv 3xo ची सुरुवाती किंमत फक्त ८ लाख रुपयांपासून सुरू होते. ही गाडी परदेशी कंपनीच्या kia सोनट आणि हुंदई व्हेनूला सुद्धा भारी पडते. जर xuv 3xo फिचर्स आणि इंजिनची तुलना केली तर किया मोटर्सच्या सोनटपेक्षा भारी भरते.
advertisement
4/7
यात तीन इंजिन पर्याय आहेत - १.२ लीटर टर्बो पेट्रोल (११० बीएचपी), १.२ लीटर डायरेक्ट-इंजेक्शन टर्बो पेट्रोल (१३१ बीएचपी) आणि १.५ लीटर डिझेल (११७ बीएचपी). यात ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, ६-स्पीड मॅन्युअल आणि एएमटीचा पर्याय आहे. त्याची अंतर्गत रचना XUV400 Pro इलेक्ट्रिक SUV सारखीच आहे.
advertisement
5/7
यात पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटीसह १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अपडेटेड ७-स्पीकर हरमन कार्डन म्युझिक सिस्टम, १०.२५-इंच पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आहेत. यात ADAS लेव्हल-२ आणि ३६० अंश कॅमेरा देखील आहे.
advertisement
6/7
या कारमध्ये सुरक्षेसाठी लेव्हल 2 एडीएएस, अँटि लॉक ब्रेकिंग सिस्टीम, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम, 6 एअर बॅग्ज, सर्वांत मोठं सनरूफ आणि 360 अंशाचा कॅमेरा अशी फीचर्स आहेत.
advertisement
7/7
विशेष म्हणजे, सुरक्षेच्या तुलनेतही ही कार ५ स्टार रेटिंग बेस आहे. भारत एनसीएपी कडून क्रॅश टेस्टमध्ये महिंद्रा XUV 3XO ला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले. ही कार तीन इंजिन ऑप्शनसह येते. या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.2-लिटर टर्बो आणि 1.2-लिटर TGDi चा ऑप्शन आहे. या कारच्या इंजिनमध्ये 1.5 लिटर टर्बो डिझेलचा ऑप्शन देखील समाविष्ट आहे. ही 5 सीटर कार 16 रंगांमध्ये येते. या महिंद्रा कारमध्ये स्कायरूफ देखील देण्यात आला आहे. महिंद्रा XUV 3XO ची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 15.56 लाख रुपयांपर्यंत जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
मर्सिडिजसारखे फिचर्स, टँकसारखी कडक, बजेट फ्रेंडली SUV साठी लोकांच्या रांगा, किंमतही कमी!