TRENDING:

Maruti ची पाठीमागून मर्सिडीजसारखी दिसणारी SUV, तब्बल 1.12 लाखाने झाली स्वस्त, इतकी आहे किंमत!

Last Updated:
मारुती सुझुकीने सुद्धा आपले सुधारीत दर जाहीर केले आहे. मारुतीच्या अनेक गााड्या या आता बजेट फ्रेंडली झाल्या आहेत, अशातच maruti suzuki fronx या मिड क्रॉस SUV ची किंमत सुद्धा कमी झाली आहे.
advertisement
1/7
Maruti ची पाठीमागून मर्सिडीजसारखी दिसणारी SUV, 1.12 लाखाने झाली स्वस्त, इतकी आहे
केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २८ टक्के स्लॅब आता रद्द झाला आहे. २२ सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. ऑटो सेक्टरमध्ये सगळ्याचं गाड्यांच्या किंमती कमी झाल्या आहे. मारुती सुझुकीने सुद्धा आपले सुधारीत दर जाहीर केले आहे. मारुतीच्या अनेक गााड्या या आता बजेट फ्रेंडली झाल्या आहेत, अशातच maruti suzuki fronx या मिड क्रॉस SUV ची किंमत सुद्धा कमी झाली आहे. या कारच्या किंमतीत तब्बल १.१० लाख रुपयांची कपात झाली आहे.
advertisement
2/7
मारुती सुझुकीची फ्राँक्स लवकरच हायब्रिड प्रकारात लाँच होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मारुतीने या कारच्या किंमतीत कपात केली होती. आता जीएसटीतील बदलामुळे १,१२, ६०० रुपयांची कपात झाली आहे. या कारची किंमत आता ६,२३,८०० एक्स शोरूम इतकी असणार आहे. या कारमध्ये५ व्हॅरिएंट उपलब्ध असतील. यामध्ये पेट्रोल मॅन्युअल, पेट्रोल ऑटोमॅटिक आणि टर्बो पेट्रोल व्हॅरिएंट्सचा समावेश आहे.
advertisement
3/7
Fronx मध्ये दोन इंजिन ऑप्शन मिळतात, ज्यामध्ये 1-लीटर टर्बो-पेट्रोल माइल्ड-हायब्रिड इंजिन 100 bhp पॉवर आणि 148 Nm टॉर्क आणि 90 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क निर्माण करणारे 1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन समाविष्ट आहे.
advertisement
4/7
फीचर्स फ्राँक्स ही एक अतिशय स्टायलिश कार असून ड्युएल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात बसवलेलं 1.0-लिटर टर्बो बूस्टरजेट पेट्रोल इंजिन खूप शक्तिशाली आहे. ते 5.3 सेकंदात ताशी 0 ते 60 किलोमीटरपर्यंत वेग नेऊ शकतं. अॅडव्हान्स्ड 1.2-लिटर के-सीरिज, ड्युएल जेट, ड्युएल व्हीव्हीटी इंजिन शहरात आणि लाँग ड्राइव्हवर उत्तम परफॉर्मन्स देते. हे इंजिन स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानासह मिळते. ते इंजिन पॅडल शिफ्टर्ससह 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेलं आहे. त्यात ऑटो गिअर शिफ्टचा पर्यायही उपलब्ध आहे. ही कार एका लिटर पेट्रोलवर 23 किलोमीटरपर्यंत धावते.
advertisement
5/7
या कारमध्ये लेदर रॅप्ड स्टीअरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, हेड-अप डिस्प्ले, ड्युअल-टोन एक्सटिरिअर कलर, वायरलेस चार्जर, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, 6-स्पीकर, हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रिअर एसी व्हॅंट्स, फास्ट यूएसबी चार्जिंग पॉइंट, कनेक्टेड कार फीचर्स, रियर व्ह्यू कॅमेरा आणि 9-इंचाची टचस्क्रीन यांसारखी फीचर्स उपलब्ध आहेत.
advertisement
6/7
सुरक्षेसाठी या कारमध्ये सहा एअरबॅग्ज, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, रिअर व्ह्यू कॅमेरा, थ्री पॉइंट सीट बेल्ट, अँटी थेफ्ट सिक्युरिटी सिस्टीम, ISOFIX चाइल्ड सीट, सीट बेल्ट रिमाइंडर सिस्टीम यांसारखी फीचर्स आहेत.
advertisement
7/7
कारची लांबी 3995mm, रुंदी 1765mm आणि उंची 1550mm आहे. व्हीलबेस 2520mm आहे. याशिवाय, कारमध्ये 308 लिटरची बूट स्पेस आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Maruti ची पाठीमागून मर्सिडीजसारखी दिसणारी SUV, तब्बल 1.12 लाखाने झाली स्वस्त, इतकी आहे किंमत!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल