TRENDING:

स्कुटर की बाईक कशाला लागतं जास्त पेट्रोल? कंफर्ट आणि मायलेजच्या रेसमध्ये कोणती गाडी बेस्ट?

Last Updated:
काहींकडे बाईक असते तर काहींकडे स्कूटर. स्कूटर हलकं, सहज चालवता येणारं आणि पार्किंगला कमी जागा घेणारं असल्यामुळे स्कुटरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र एक प्रश्न अनेकांच्या मनात कायम समोर येते.
advertisement
1/8
स्कुटर की बाईक कशाला लागतं जास्त पेट्रोल? मायलेजच्या रेसमध्ये कोणती गाडी बेस्ट?
शहरात रोजची ये-जा करणं, ऑफिसची धावपळ, शॉपिंग, डिलिव्हरीचं काम किंवा घरगुती वापर या सगळ्या गोष्टींसाठी टू व्हिलर हे आजच्या काळात एक सोयीस्कर वाहन मानलं जातं. पण यामध्ये काहींकडे बाईक असते तर काहींकडे स्कूटर. स्कूटर हलकं, सहज चालवता येणारं आणि पार्किंगला कमी जागा घेणारं असल्यामुळे स्कुटरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र एक प्रश्न अनेकांच्या मनात कायम समोर येते.
advertisement
2/8
मायलेजच्या बाबतीत स्कुटर आणि बाईक यांच्यात नेमका फरक काय? बाईकच्या तुलनेत स्कुटर जास्त पेट्रोल का खाते? चला, हे थोडक्यात समजून घेऊया.
advertisement
3/8
बहुतेक स्कुटरमध्ये Continuously Variable Transmission (CVT) असतो. हा गिअर सिस्टम इंजिनला जास्त RPM वर चालवतो आणि त्यामुळे पेट्रोलची खपत वाढते. स्पीड आणि इंजिनच्या लोडनुसार CVT आपोआप गिअर बदलतो, पण स्कुटरला वेग वाढवायचा असेल तर इंजिनवर जास्त ताण येतो आणि पेट्रोलही जास्त जळतं.
advertisement
4/8
याउलट, बाईकमध्ये मॅन्युअल गिअरबॉक्स असतो. राइडर स्वतः ठरवू शकतो की कोणत्या वेळी गिअर बदलायचा. तो कमी RPM वरही बाईक चालवू शकतो, ज्यामुळे मायलेज आपोआप वाढतं. ही सुविधा स्कुटरमध्ये नसल्यामुळे त्याचं मायलेज तुलनेने कमी येतं.
advertisement
5/8
स्कुटरचा फ्यूल टँक लहान असतोस्कुटरमध्ये साधारणपणे छोटा फ्यूल टँक असतो. त्यामुळे एकदा पेट्रोल भरलं तरी स्कुटर कमी अंतर कापते. बाईकमध्ये मोठा टँक असल्यामुळे एकदाच पेट्रोल भरून लांब पल्ल्याची सफर आरामात करता येते. यामुळेही बाईक अधिक ‘इंधन-किफायती’ वाटते.
advertisement
6/8
राइडिंग स्टाईलही मायलेजवर परिणाम करतेमशीनच नाही तर राइडरचा चालवण्याचा पद्धतीवरही मायलेज अवलंबून असतं. अनुभवी राइडर बाईकचे गिअर योग्य वेळी बदलून उत्तम मायलेज काढू शकतो. पण स्कुटरमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असल्यामुळे अशी मायलेज कंट्रोलची सुविधा नसते.
advertisement
7/8
शिवाय स्कुटर मुख्यतः शहरातील छोटी अंतरं, रुक-रुक ट्रॅफिक यासाठी वापरल्या जातात. अशा परिस्थितीत सतत ब्रेक एक्सिलरेटरमुळे स्कुटरची मायलेज आणखी कमी होते. दुसरीकडे, बाईक लांब पल्ल्यासाठी बनवलेली असल्याने ती स्थिर वेगात चालते आणि मायलेजही चांगलं देते.
advertisement
8/8
मग बेस्ट कोणती? स्कुटर की बाईक?जर मायलेज तुमचं प्राधान्य असेल, तर बाईक हा अधिक किफायती पर्याय आहे. पण सोय, आराम, सिटी राइड आणि युजर्सच्या आवश्यकतांनुसार स्कुटर अजूनही पहिली पसंती आहे. दोन्ही वाहनांच्या वापरात फरक आहे त्यामुळे मायलेजमध्येही फरक दिसतो
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
स्कुटर की बाईक कशाला लागतं जास्त पेट्रोल? कंफर्ट आणि मायलेजच्या रेसमध्ये कोणती गाडी बेस्ट?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल