TRENDING:

Toyota चा धमाका, नव्याने आणली 'रोड किंग SUV', स्कॉर्पिओ सुद्धा वाटेल छोटी!, किंमतही केली कमी

Last Updated:
Toyota Kirloskar Motor ची सर्वात लोकप्रिय असलेली फॉर्च्युनर आता नवीन रुपात आणि नव्या रंगात दिवाळीच्या तोंडावर लाँच केली आहे.
advertisement
1/8
Toyota चा धमाका, नव्याने आणली 'रोड किंग SUV', स्कॉर्पिओ सुद्धा वाटेल छोटी!
राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची ऑल टाईम फेव्हरेट असलेली फॉर्च्युनर Toyota Fortuner Leade Edition अखेर लाँच झाली आहे. Toyota Kirloskar Motor ची सर्वात लोकप्रिय असलेली फॉर्च्युनर आता नवीन रुपात आणि नव्या रंगात दिवाळीच्या तोंडावर लाँच केली आहे. नवी फॉर्च्युनर ही 2024 च्या  Leader Edition  मॉडेलच्या लोकप्रियतेनंतर लाँच केली आहे. आता नवीन फॉर्च्युनर ही अधिक स्टायलिश, स्पोर्टी आणि दमदार फिचर्ससह आली आहे.
advertisement
2/8
नवीन फॉर्च्युनरचा लूक आता आणखी आकर्षक असाच आहे.  2025 Fortuner Leader Edition मध्ये बोल्ड आणि स्पोर्टी डिझाईन दिली आहे. यामध्ये नवीन  ग्रिल डिझाईन आणि फ्रंट-रिअर बंपर स्पॉइलर आहे.  ड्यूल-टोन ब्लॅक रूफ,  सिग्नेचर हुड एम्ब्लेम ग्लॉसी ब्लॅक अलॉय व्हील्स दिले आहे ज्यामुळे ही  SUV आता आणखी प्रिमियम लुक देत आहे.
advertisement
3/8
Toyota Fortuner Leade Edition 2025 मध्ये इंटिरियर्स अत्यंत प्रीमियम आणि रिफाईंड आहेत.  ब्लॅक आणि मॅरून ड्यूल-टोन सीट्स आणि डोअर ट्रिम,  स्मार्ट ऑटो-फोल्ड मिरर इल्युमिनेटेड स्कफ प्लेट्स, अत्याधुनिक टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS) दिले आहे. ज्यामुळे  ड्रायव्हिंगचा अनुभव आरामदायक आणि सुरक्षित दोन्ही असेल.
advertisement
4/8
Toyota Fortuner Leade Edition 2025 चं इंजिन हे 1GD-FTV 2.8L टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. जे 201 bhp पॉवर आणि  500 Nm इतका टॉर्क जनरेट करतो. या एसयूव्हीमध्ये 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक आहे.  तसंच  4×2 रिअर-व्हील ड्राइव्ह सुद्धा आहे.  या इंजिनमुळे SUV नेहमीसारखी दमदार परफॉर्मन्स देते. 
advertisement
5/8
Toyota Fortuner Leade Edition 2025 मध्ये 4×2 ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये  Attitude Black, Super White, Pearl White आणि Silver रंगाचा पर्याय उपलब्ध आहे. 
advertisement
6/8
फॉर्च्युनर लीडर एडिशनसाठी अनेक फायनान्स पर्याय आहे, यामध्ये  8 वर्षांपर्यंतचे EMI प्लॅन असून टोयोटा स्मार्ट बलून फायनान्स (Toyota Smart Balloon Finance) कडून दिला जातो.
advertisement
7/8
यासाठी प्री-अप्रूव्ह्ड व्हॅल्यू-ऍडेड सर्व्हिसेस जसं की एक्सटेंडेड वॉरंटी आणि जेन्युईन ॲक्सेसरीज आहे. यासह 5 वर्षांसाठी मोफत रोडसाईड असिस्टन्स, 3 वर्षे/1,00,000 km वॉरंटी (5 वर्षे/2,20,000 km पर्यंत वाढवता येते आणि टोयोटा स्माईल्स प्लस सर्व्हिस पॅकेज देखील मिळते.
advertisement
8/8
Toyota Fortuner Leade Edition 2025  ची बुकिंग ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल. तुम्हाला जर ऑनलाईन बुकिंग करायची असेल  www.toyotabharat.com या कंपनीच्या अधिकृत साईटवर भेट देऊ शकतात.  नव्या फॉर्च्युनरची किंमत ३३ लाखांपासून सुरू होते. 4x4 व्हेरिएंट 41 लाखांपर्यंत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Toyota चा धमाका, नव्याने आणली 'रोड किंग SUV', स्कॉर्पिओ सुद्धा वाटेल छोटी!, किंमतही केली कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल