TRENDING:

Toyota चा धमाका, भारतात लाँच केली पहिली इलेक्ट्रिक SUV; 543 किमी बिनधास्त फिरा!

Last Updated:
भारतात टाटा, महिंद्रा मोटर्सने एकीकडे इलेक्ट्रिक मार्केटमध्ये दबदबा राखला आहे. आता त्यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी टोयोटाने आपलीही पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही आणली आहे.
advertisement
1/11
Toyota चा धमाका, भारतात लाँच केली पहिली इलेक्ट्रिक SUV;  543 किमी बिनधास्त फिरा!
भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात मोठा टर्निंग पॉईंट ठरवत टोयोटा किर्लोस्कर मोटरने आज आपली पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV ‘टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही’ ( toyota urban cruiser ev) लाँच केली आहे. आतापर्यंत हायब्रिड आणि हायड्रोजन तंत्रज्ञानावर भर देणाऱ्या टोयोटाने अखेर ईव्ही सेगमेंटमध्ये उडी घेतली असून, टाटा, महिंद्रा आणि सुझुकीनंतर आता टोयोटाही थेट स्पर्धेत उतरली आहे. एकेकाळी इलेक्ट्रिक कारला विरोध करणाऱ्या टोयोटाने आज ही कार भारतीय ग्राहकांसमोर आणत आपली ठाम भूमिका बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement
2/11
डिझाइनच्या बाबतीत अर्बन क्रूझर ईव्ही ही एक खरी SUV कॅरेक्टर असलेली कार आहे. Sophisticated डिझाइन, Bold Appearance आणि Refined Styling यामुळे ही ईव्ही रस्त्यावर वेगळीच ओळख निर्माण करते. टोयोटाच्या सिग्नेचर हेडलॅम्प आणि DRL, अर्बन टेक-प्रेरित फॅशिया आणि दमदार बॉडी लूकमुळे ही SUV तरुणांसह कुटुंबीयांनाही आकर्षित करेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
advertisement
3/11
परफॉर्मन्सच्या आघाडीवर ही इलेक्ट्रिक SUV Lithium Iron-Phosphate (LFP) बॅटरीसह येणार असून, 49 kWh आणि 61 kWh असे दोन बॅटरी पर्याय उपलब्ध असतील.
advertisement
4/11
कारला 120 kW पॉवर आणि 189 Nm टॉर्क मिळणार असून, एका पूर्ण चार्जवर 500 ते 550 किमी पर्यंतची रेंज देण्याचा दावा करण्यात आला आहे. बॅटरी कूलिंग सिस्टममुळे उन्हाळ्यात जलद कूलिंग, स्थिर बॅटरी तापमान आणि सातत्यपूर्ण आउटपुट मिळतो, ज्यामुळे बॅटरीचे आयुष्य आणि परफॉर्मन्स दोन्ही सुधारतात.
advertisement
5/11
लक्झरी आणि टेक्नॉलॉजीच्या बाबतीतही टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही पुढे आहे. केबिनमध्ये Ventilated Seats, Panoramic Roof, 10.1-इंच इंटिग्रेटेड इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जर, डायल-टाइप शिफ्ट गिअर नॉब, 12-कलर व्हेरिएबल अॅम्बियंट लाइटिंग आणि प्रीमियम JBL साउंड सिस्टम देण्यात आले आहे.
advertisement
6/11
सुरक्षेसाठी सर्व व्हेरिएंट्समध्ये 7 SRS एअरबॅग्स, मजबूत हाय-टेनसाइल स्ट्रक्चर आणि संतुलित सस्पेन्शन देण्यात आले असून, iConnect मोबाईल अ‍ॅपद्वारे 100 हून अधिक स्मार्ट कनेक्टेड फीचर्स, चार्जिंग माहिती आणि रिअल-टाइम अलर्ट्स मिळणार आहेत.
advertisement
7/11
अर्बन क्रूझर ईव्हीची अंदाजित एक्स-शोरूम किंमत 20 ते 25 लाख रुपये असण्याची शक्यता असून, आजपासून 25,000 रुपयांत बुकिंग सुरू करण्यात आले आहे. 8 वर्षांची बॅटरी वॉरंटी, Battery-as-a-Service पर्याय, 3 वर्षांनंतर 60 टक्क्यांपर्यंत Assured Buy Back, 500+ BEV सर्व्हिस टचपॉइंट्स, 24x7 रोडसाइड असिस्टन्स आणि Charge Zone व Jio-BP सोबतची चार्जिंग भागीदारी आहे.
advertisement
8/11
ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेला ही आमच्या मल्टी-पाथवे दृष्टिकोनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्याद्वारे आम्ही कार्बन न्यूट्रॅलिटीच्या दिशेने वाटचाल करताना कोणालाही मागे न ठेवण्याचा प्रयत्न करतो. या SUV च्या माध्यमातून आम्ही भारताच्या ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाला पाठिंबा देण्याची आमची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करतो. आमचे मजबूत उत्पादन पोर्टफोलिओ, तंत्रज्ञान नेतृत्व, उत्कृष्ट आफ्टर-सेल्स सेवा व विस्तृत डीलर नेटवर्क याच्या जोरावर आम्ही शाश्वत मोबिलिटीचे उद्दिष्ट साध्य करू." असं टोयोटा कंपनीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मसाकाझू योशिमुरा यांनी सांगितलं.
advertisement
9/11
तर यावेळी टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचे उपव्यवस्थापकीय संचालक तादाशी असाझुमा, डेप्युटी म्हणाले की,“इलेक्ट्रिफाईड तंत्रज्ञानामध्ये टोयोटाला तीन दशकांचा जागतिक अनुभव आहे. यामुळे आज जगभरात ३८ दशलक्षांहून अधिक इलेक्ट्रिफाईड वाहने रस्त्यावर असून, ग्राहकांनी मिळून १९७ दशलक्ष टनांपेक्षा अधिक कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत केली आहे.
advertisement
10/11
‘मास हॅपिनेस’ ही आमची तत्वज्ञानाची संकल्पना असून त्याचा पाया कार्बन न्यूट्रॅलिटीवर आधारित आहे. याच तत्वज्ञानावर टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या पहिल्या BEV — ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेला — ची तयारी करण्यात आली आहे. उत्पादनासोबतच आम्ही ग्राहकांना जागतिक दर्जाचा, सुरक्षित व तणावमुक्त मालकी अनुभव देण्यासाठी सज्ज आहोत.” असंही ते म्हणाले.
advertisement
11/11
एकंदरीत भारतात टाटा, महिंद्रा मोटर्सने एकीकडे इलेक्ट्रिक मार्केटमध्ये दबदबा राखला आहे. या त्यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी टोयोटाने आपलीही पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही आणली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Toyota चा धमाका, भारतात लाँच केली पहिली इलेक्ट्रिक SUV; 543 किमी बिनधास्त फिरा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल