IND vs NZ : टीम इंडियातल्या 10 जागा फिक्स, एका जागेसाठी दोघांमध्ये रेस, पहिल्या T20 मध्ये चौघांना डच्चू!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला बुधवारपासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना नागपूरच्या जामठा स्टेडियमवर होणार आहे.
advertisement
1/8

टी-20 वर्ल्ड कपच्या आधी टीम इंडियाची ही शेवटची सीरिज आहे, त्यामुळे वर्ल्ड कपआधी भारतीय खेळाडूंना तयारीची ही शेवटची संधी आहे. या सीरिजमध्ये संघर्ष करणाऱ्या भारतीय खेळाडूंना त्यांचा फॉर्म सुधारावा लागणार आहेत.
advertisement
2/8
न्यूझीलंडविरुद्धची टी-20 सीरिज आणि टी-20 वर्ल्ड कपसाठी भारताने एकाच टीमची निवड केली होती. पण तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमधून दोघं बाहेर झाले आहेत.
advertisement
3/8
तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याऐवजी न्यूझीलंड सीरिजसाठी श्रेयस अय्यर आणि रवी बिष्णोई यांची भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. पहिल्या टी-20 साठी भारताची प्लेइंग इलेव्हन जवळपास निश्चित असली, तरी एका जागेसाठी दोन खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे.
advertisement
4/8
शुभमन गिलला डच्चू दिल्यामुळे संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ओपनिंगला खेळतील. तर तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव मैदानात उतरू शकतो. पण सूर्याने चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय घेतला, तर तिसऱ्या क्रमांकावर इशान किशनला संधी मिळू शकते.
advertisement
5/8
सूर्यकुमार यादवने तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग केली तर चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरचा विचार होण्याची शक्यता आहे. म्हणजेच सूर्यकुमार यादवच्या बॅटिंग क्रमवारीवर श्रेयस अय्यर किंवा इशान किशनचं खेळणं अवलंबून असेल.
advertisement
6/8
पाचव्या क्रमांकावर अक्षर पटेल खेळेल तर फिनिशरची जबाबदारी हार्दिक पांड्या, रिंकू सिंग आणि शिवम दुबेवर असेल. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग हे दोन स्पिनर असतील. तर वरुण चक्रवर्ती हा एकमेव स्पेशलिस्ट स्पिनर मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
advertisement
7/8
दुसरा स्पिनर म्हणून अक्षर पटेल हा एकमेव पर्याय कॅप्टन सूर्यकुमार यादवकडे असेल. या प्लेइंग इलेव्हनसह टीम इंडिया मैदानात उतरली तर कुलदीप यादव, हर्षित राणा, रवी बिष्णोई हे तिघं आणि श्रेयस अय्यर किंवा इशान किशन यांच्यापैकी एकाला बाहेर बसावं लागेल.
advertisement
8/8
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन (विकेट कीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : टीम इंडियातल्या 10 जागा फिक्स, एका जागेसाठी दोघांमध्ये रेस, पहिल्या T20 मध्ये चौघांना डच्चू!