TRENDING:

ब्रेन ट्युमर होऊनही अभ्यास सुरू ठेवला, गावातली तरुणी KBC मध्ये जिंकली 50 लाख रुपये, अमिताभ बच्चन यांनी दिलं आणखी एक गिफ्ट

Last Updated:
ब्रेन ट्युमर होऊनही न खचता एका तरुणीने अभ्यास सुरुच ठेवला आणि कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात 50 लाख रुपये जिंकले. विशेष म्हणजे तिला ज्येष्ठ अभिनेते अभिताभ बच्चन यांनी एक भेटवस्तूही दिली. ही तरुणी नेमकी कौन आहे, तिच्या हा प्रवास नेमका कसा झाला ते जाणून घेऊयात. (अंकित राजपूत/जयपूर, प्रतिनिधी)
advertisement
1/5
ब्रेन ट्युमर होऊनही अभ्यास सुरू ठेवला, गावातली तरुणी KBC मध्ये जिंकली 50 लाख...
नरेशी मीणा असे या तरुणीचे नाव आहे. ती राजस्थामधील सवाई माधोपुर जिल्ह्यातील एंडा या लहानशा गावातील रहिवासी आहे. ती सध्या राजस्थानमधील महिला सक्षमीकरण विभागात पर्यवेक्षक पदावर कार्यरत आहे. तिचे कोचिंग टीचर असलेले गंगापूर येथील योगेश यांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात 25 लाख रुपये जिंकले होते. त्यांना प्रभावित होऊन तिला या कार्यक्रमात जाण्याची इच्छा निर्माण झाली.
advertisement
2/5
ब्रेन ट्युमर होऊनही अभ्यास सुरू ठेवला, गावातली तरुणी KBC मध्ये जिंकली 50 लाख...
खूप कमी लोकं या कार्यक्रमापर्यंत पोहोचतात. मात्र, तिने हे स्वप्न पूर्ण केले. तिने या कार्यक्रमात 50 लाख रुपये जिंकले आणि मग नंतर 1 कोटीच्या प्रश्नावर थांबण्याचा निर्णय घेतला. तिचे वय 27 वर्ष आहे. मात्र, तिला ब्रेन ट्यूमरचा आजार झाला. पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास केल्यावर वैद्यकीय चाचणी दरम्यान, तिला हा आजार असल्याचे निदान झाले. तिच्या घरची परिस्थिती नाजूक असतानाही त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार केले.
advertisement
3/5
नरेशी मीणा हिच्या कुटुंबात तिची आई छोटी देवी, वडील राजमल आणि दोन मोठे भाऊ शिवराम आणि लक्ष्मीकांत यांचा समावेश आहे. तिने आपल्या गावातील सरकारी शाळेत 9 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 12 वी शिक्षण सवाई माधोपूर येथील सुरभि पब्लिक स्कूल येथून पूर्ण केले. यानंतर 2015 मध्ये त्यांनी बीए मध्ये प्रवेश घेतला आणि 2017 मध्ये इतिहास, राज्यशास्त्र आणि हिंदी विषयात पदवीचे शिक्षण घेतले. यानंतर राज्यशास्त्रातच पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले.
advertisement
4/5
यासोबतच तिने आपले शिक्षण सुरू ठेवले. ती राजस्थान लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पास झाली होती. मात्र, परिक्षा आणि कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाची तारीख जवळपास होती. त्यामुळे नरेशी हिने परीक्षा न देता केबीसी मध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
advertisement
5/5
यानंतर या कार्यक्रमामध्ये जात तिने 50 लाख रुपये जिंकले. यानंतर गावी परतल्यावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. केबीसी दरम्यान, तिने आपल्या आजाराबाबत अमिताभ बच्चन यांना सांगितले. ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन झाले आहे, मात्र, या ट्यूमरचा काही भाग अजूनही तिच्या मेंदूमध्ये आहे. ही गाठ तिच्या मेंदूच्या अशा जागी अडकली आहे, जिथून ती पूर्णपणे काढून टाकणे प्राणघातक ठरू शकते. हे सर्व ऐकल्यावर अमिताभ बच्चन यांनी ते तिच्यावर उपचार करण्यासाठी मदत करणार असल्याचे कार्यक्रमात सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
ब्रेन ट्युमर होऊनही अभ्यास सुरू ठेवला, गावातली तरुणी KBC मध्ये जिंकली 50 लाख रुपये, अमिताभ बच्चन यांनी दिलं आणखी एक गिफ्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल