TRENDING:

90 पैशांचा दिवा अन् 1 रुपयात पणती, दिवाळीत बिझनेससाठी एवढं स्वस्त कुठेच नाही!

Last Updated:
दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असून बाजारपेठा सजू लागल्या आहेत. आपणही या काळात छोटासा व्यवसाय करू शकता.
advertisement
1/9
90 पैशांचा दिवा अन् 1 रुपयात पणती, दिवाळीत बिझनेससाठी एवढं स्वस्त कुठेच नाही!
आता दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे बाजारात ठीक ठिकाणी दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने खुली झाली आहेत. त्यातच विविध प्रकारच्या पणत्या, दिवे इत्यादीचे दुकान आपल्याला बघायला मिळत आहेत.
advertisement
2/9
तुम्हाला देखील यंदाच्या दिवाळीत स्वतःचा पणती किंवा दिव्यांचा व्यवसाय करण्याची इच्छा असेल, तर मुंबईतील कुंभारवाडा ही जागा तुम्हाला माहीत असायला हवी.
advertisement
3/9
मुंबईच्या धारावी परिसरातील मोठ्या वस्तीत कुंभारवाडा आहे. या ठिकाणी पणती, दिवा, मडकी, कंदील इत्यादी मातीच्या वस्तू आपल्याला होलसेल दरात खरेदी करता येतील. या वस्तूंची निर्मिती करणारे लहान कारखाने या परिसरात आहेत.
advertisement
4/9
मातीची भांडी तयार करणारे कारखाने या ठिकाणी असल्यामुळे येथे मिळणारे मातीचे भांडे, त्याचप्रमाणे दिवाळीसाठी लागणारे दिवे पणती अगदी वाजवी दरात खरेदी करता येतील.
advertisement
5/9
येथे साधा मातीचा दिवा हा 90 पैशांपासून विकण्यास सुरू होतो. त्यात आणखीन नक्षीदार दिवे हे 1 ते 2 रुपये प्रति दिवा अशा किमतीत खरेदी करता येईल. कलर केलेले नक्षीदार दिवे 20 रुपयांच्या पाकिटात प्रति 6 नग मिळतील.
advertisement
6/9
स्वतःचा पणत्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत-कमी एक हजार रुपयांचा भांडवल लागेल.
advertisement
7/9
90 पैशात 1 म्हणून अनेक प्रकारच्या पणती त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे एकच प्रकारच्या नक्षीची पणती खरेदी करण्याची आवश्यकता नाही.
advertisement
8/9
ग्राहकांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिल्यास व्यवसाय योग्यरीत्या वाढतो. 1 रुपयाची पणती आपण 4 ते 5 रुपयात विकू शकतो. त्यामुळे या दिवाळीत चांगला नफा मिळवता येईल.
advertisement
9/9
या व्यवसायात जास्त देखभालीची गरज नाही. एक लहानसा टेबल स्टॉल लावूनही कमी खर्चात जास्त नफा मिळवता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
90 पैशांचा दिवा अन् 1 रुपयात पणती, दिवाळीत बिझनेससाठी एवढं स्वस्त कुठेच नाही!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल