308 अफेअर्स, 3 लग्न आणि… 66 वर्षीय संजय दत्तला एकूण किती मुलं? एक मुलगी तर 37 वर्षांची
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
संजय दत्तने तीन लग्न केली, पण त्याआधी त्याच्या ३०८ हून अधिक अफेअर्सची चर्चा होती. त्याच्या लग्नांच्या आणि मुलांच्या आयुष्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
1/10

मुंबई: बॉलिवूडमध्ये संजय दत्त हे नाव वाद आणि यश दोन्हीसाठी ओळखलं जातं. त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांवर जादू केली, पण त्याचं आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं रंजक आणि नाट्यमय होतं.
advertisement
2/10
संजय दत्तने तीन लग्न केली, पण त्याआधी त्याच्या ३०८ हून अधिक अफेअर्सची चर्चा होती. त्याच्या लग्नांच्या आणि मुलांच्या आयुष्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
3/10
संजय दत्तने पहिलं लग्न अभिनेत्री ऋचा शर्मासोबत १९८७ मध्ये केलं. त्यांच्या लग्नानंतर त्यांना त्रिशाला दत्त ही मुलगी झाली, जिचं वय आज ३७ वर्ष आहे.
advertisement
4/10
लग्नानंतर ऋचा शर्माला कॅन्सर झाल्याचं समजलं. तिने अमेरिकेत जाऊन उपचार घेतले, पण दुर्दैवाने १९९६ मध्ये वयाच्या ३२ व्या वर्षी तिचं निधन झालं.
advertisement
5/10
ऋचाच्या निधनानंतर मॉडेल रिया पिल्लई संजयच्या आयुष्यात आली. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय जेलमध्ये असताना रियाने त्याला खूप साथ दिली.
advertisement
6/10
तिच्या याच स्वभावाने संजयचं मन जिंकलं. जेलमधून बाहेर आल्यावर संजयने १४ फेब्रुवारी १९९८ रोजी रियासोबत लग्न केलं. पण, हे लग्न १० वर्ष टिकलं. २००८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
advertisement
7/10
काही रिपोर्ट्सनुसार, संजय दत्त कामात खूप व्यस्त असल्यामुळे ते दोघे एकमेकांना वेळ देऊ शकत नव्हते. तर, काही सूत्रांनुसार, जेव्हा संजय दत्त मान्यताच्या जवळ येत होता, तेव्हा रिया टेनिसपटू लिएंडर पेसला डेट करत होती.
advertisement
8/10
यावर यासर उस्मानच्या पुस्तकात लिहिलं आहे की, “संजय दत्तने घटस्फोटाच्या बदल्यात रियाला वांद्रेमध्ये दोन फ्लॅट दिले होते.”
advertisement
9/10
रिया पिल्लईपासून घटस्फोट घेतल्यानंतर संजय दत्तने ७ फेब्रुवारी २००८ रोजी मान्यतासोबत लग्न केलं. त्यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना २१ ऑक्टोबर २०१० रोजी जुळी मुलं झाली. मुलाचं नाव शारान आणि मुलीचं नाव इकरा आहे. त्यांची मुलं आता १५ वर्षांची आहेत.
advertisement
10/10
अशा प्रकारे, संजय दत्तला तीन मुलं आहेत. पहिल्या पत्नीपासून त्रिशाला ही ३७ वर्षांची मुलगी, तर तिसऱ्या पत्नी मान्यतापासून शारान आणि इकरा ही १५ वर्षांची जुळी मुलं आहेत. दुसऱ्या पत्नीपासून त्याला कोणतीही मुलं नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
308 अफेअर्स, 3 लग्न आणि… 66 वर्षीय संजय दत्तला एकूण किती मुलं? एक मुलगी तर 37 वर्षांची