TRENDING:

Janhvi Kapoor Plastic Surgery : कोणाच्या सांगण्यावरून जान्हवी कपूरने केली प्लास्टिक सर्जरी? जवळच्या व्यक्तीचं नाव घेत मनातलं सांगूनच टाकलं

Last Updated:
Janhvi Kapoor Plastic Surgery : अभिनेत्री जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये तिच्या प्लास्टिक सर्जरीच्या सतत होणाऱ्या चर्चांवर अखेर मनमोकळेपणाने भाष्य केले आहे.
advertisement
1/7
कोणाच्या सांगण्यावरून जान्हवी कपूरने केली प्लास्टिक सर्जरी?अखेर मनातलं सांगितलंच
मुंबई: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये तिच्या प्लास्टिक सर्जरीच्या सतत होणाऱ्या चर्चांवर अखेर मनमोकळेपणाने भाष्य केले आहे.
advertisement
2/7
नुकत्याच करण जोहरसोबत ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' या टॉक शोमध्ये तिने ब्यूटी स्टँडर्ड आणि सोशल मीडियाचा दबाव याबद्दल काही मोठे सिक्रेट्स सांगितले आहेत.
advertisement
3/7
जान्हवी कपूरने स्पष्ट केले की, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी सार्वजनिकपणे का शेअर करते. तिने परफेक्शनिझमच्या वातावरणावर टीका केली.
advertisement
4/7
जान्हवी म्हणाली, "मी गेटकीपिंगमध्ये विश्वास ठेवत नाही. सोशल मीडियाच्या सुरुवातीच्या काळात माझ्यावरही लोकांच्या अपेक्षांचा खूप प्रभाव पडला होता. कोण कसं दिसायला हवं, याबद्दलचे जजमेंट्स मी पाहिले आहेत. तरुण मुलींना परफेक्ट असणं गरजेचं आहे, असं वाटू नये."
advertisement
5/7
जान्हवीने बफेलो-प्लास्टीसारख्या शस्त्रक्रियांच्या व्हायरल चर्चा आणि व्हिडिओंवर थेट उत्तर दिले. तिने सांगितले की, सौंदर्य वाढवण्यासाठी तिने जे काही निर्णय घेतले, ते पूर्णपणे विचारपूर्वक आणि आई श्रीदेवीच्या सल्ल्यानुसारच घेतले.
advertisement
6/7
ती म्हणाली, "जर एखादी तरुण मुलगी हे व्हिडिओ बघून तेच करण्याचा प्रयत्न करेल आणि काही चूक झाली, तर ती सर्वात मोठी चूक ठरेल." बॉलिवूडमध्ये फिल्टर आणि दिखाव्यामागे लपण्याची प्रवृत्ती असताना, जान्हवीने पारदर्शकता जपण्याचा प्रयत्न केला आहे.
advertisement
7/7
जान्हवीने सांगितले, "मी पूर्णपणे प्रामाणिक राहू इच्छिते आणि माझ्या आनंदासाठी मी जो काही निर्णय घेतला, तो योग्य विचार करूनच घेतला." तिच्या मते, सौंदर्याबाबत लाज बाळगण्याची किंवा काही लपवण्याची गरज नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Janhvi Kapoor Plastic Surgery : कोणाच्या सांगण्यावरून जान्हवी कपूरने केली प्लास्टिक सर्जरी? जवळच्या व्यक्तीचं नाव घेत मनातलं सांगूनच टाकलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल