'आई व्हायचंय पण...', 31 वर्षीय बिग बॉस फेम अभिनेत्री एग फ्रीज करण्याच्या विचारात, 4 वर्षांपूर्वीच बॉयफ्रेंडचं निधन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
'बिग बॉस' मधून घराघरात पोहोचलेली आणि आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे लाखो चाहत्यांना प्रेमात पाडणारी अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका महत्त्वाच्या निर्णयामुळे चर्चेत आहे.
advertisement
1/7

मुंबई: 'बिग बॉस १३' मधून घराघरात पोहोचलेली आणि आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे लाखो चाहत्यांना प्रेमात पाडणारी अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका महत्त्वाच्या निर्णयामुळे चर्चेत आहे. लग्नाबद्दल किंवा आई होण्याबद्दल तिने थेट बोलताना, ती एग फ्रीज करण्याचा विचार करत असल्याचे उघड केले आहे.
advertisement
2/7
शहनाजने सांगितले की, तिला भविष्यात आई व्हायचे आहे, पण सध्या तिच्याकडे वेळ नाही. या क्षणाला ती पूर्णपणे तिच्या करिअरवर आणि स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करत आहे.
advertisement
3/7
मिर्ची पंजाबला दिलेल्या एका मुलाखतीत शहनाज गिलने तिच्या भविष्यातील योजनांवर स्पष्ट भाष्य केले. शहनाजच्या मते, लग्नासाठी एक योग्य वय असते आणि ते साधारणपणे ३० ते ३१ वर्षे असते. योग्य वेळी लग्न करणे खूप महत्त्वाचे आहे, असे तिचे मत आहे.
advertisement
4/7
ती म्हणाली की, आता ती ३१ वर्षांची झाली असल्यामुळे, तिला कधीकधी आई होण्याचा विचार करून खूप आनंद होतो, कारण तिचे मुलांशी भावनिक नाते खूप मजबूत आहे. मात्र, जरी मनात आई होण्याची इच्छा असली, तरी सध्या तिच्या करिअरचा आलेख चढता असल्याने, तिने विवाह आणि मातृत्व हे दोन्ही विषय सध्या बाजूला ठेवले आहेत.
advertisement
5/7
शहनाज म्हणाली, "या क्षणाला माझ्याकडे ना लग्न करायला वेळ आहे, ना बाळ जन्माला घालायला. मी पूर्णपणे माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे."
advertisement
6/7
भविष्यात तिचा आई होण्याचा प्लॅन नक्कीच आहे, पण तोपर्यंत वेळ घालवण्यासाठी तिने एक स्मार्ट उपाय शोधला आहे. "भविष्यात मी एग फ्रीज करून आई होण्याचे नियोजन करू शकते," असे तिने स्पष्ट केले. म्हणजेच, योग्य वेळ आल्यावर, जेव्हा तिचे करिअर आणि वैयक्तिक आयुष्य स्थिर होईल, तेव्हा ती नक्कीच आई बनेल.
advertisement
7/7
शहनाज गिल नुकतीच तिचा पंजाबी चित्रपट 'इक्क कुड़ी' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हा चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रिलीज झाला. या चित्रपटात तिने केवळ मुख्य भूमिकाच साकारली नाही, तर निर्माती म्हणूनही पदार्पण केले आहे. यामुळेच करिअरसाठी वेळ देणे तिला अधिक महत्त्वाचे वाटत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आई व्हायचंय पण...', 31 वर्षीय बिग बॉस फेम अभिनेत्री एग फ्रीज करण्याच्या विचारात, 4 वर्षांपूर्वीच बॉयफ्रेंडचं निधन