6 बड्या डायरेक्टर्सनी केलं दिग्दर्शन, 26 तगड्या सुपरस्टार्सची भूमिका! तरी बॉक्स ऑफिसवर आपटला हा सिनेमा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bollywood Film : बॉलीवूडच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच चित्रपटावर अनेक दिग्दर्शकांनी एकत्र काम केलं. ज्यात 10 स्टोरी, 26 स्टार आणि बजेटही जास्त होतं. तरी ही फिल्म फ्लॉप ठरली.
advertisement
1/5

एक फिल्म, ज्याच्या 10 स्टोरी, ज्याचं दिग्दर्शन 6 दिग्दर्शकांनी केलं आहे आणि फिल्ममध्ये थोडेथोडके नव्हे तर 26 सुपरस्टार्स आहेत. तरी ही फिल्म बॉक्स ऑफिसवर जोरात आपटली. क्राइम थ्रीलर फिल्म बॉक्स ऑफिसवर फ्लॉफ ठरली.
advertisement
2/5
हा चित्रपट बॉलीवूड दिग्दर्शक हंसल मेहता, मेघना गुलजार, रोहित रॉय, संजय गुप्ता, अपूर्व लक्किया आणि जसमीत धोडी यांनी एकत्रित दिग्दर्शित केला होता.
advertisement
3/5
या चित्रपटात संजय दत्त, सुनील शेट्टी, नाना पाटेकर, नसीरुद्दीन शाह, मनोज बाजपेयी, अरबाज खान, जिमी शेरगिल, अमृता सिंग, मिनिषा लांबा, सुधांशू पांडे आणि अनुपम खेर यांच्या भूमिका आहेत. आफताब शिवदासानी, दिया मिर्झा, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, नेहा धुपिया, शबाना आझमी, मासूम मखीजा, रोहित रॉय, अनिता हसनंदानी, अनुराधा पटेल, दिनो मोरिया, तरिना पटेल, नेहा ओबेरॉय आणि परमीत सेठी यांनीही काम केलं आहे.
advertisement
4/5
फिल्ममध्ये स्ट्रेंजर्स इन द नाईट, झहीर, लव्हटेल, सेक्स ऑन द बीच, राईस प्लेट, कप्पलून्स आणि राईज अँड फॉल अशा 10 वेगवेगळ्या स्टोरी आहेत.
advertisement
5/5
2007 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं बजेट 21 कोटी रुपये होते. ही फिल्म भरपूर कमाई करेल अशी अपेक्षा होती. पण झालं उलटंच.चित्रपटाने फक्त 13 कोटी रुपये कमावले. या फिल्मचं नाव आहे, 'दस कहानियां'.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
6 बड्या डायरेक्टर्सनी केलं दिग्दर्शन, 26 तगड्या सुपरस्टार्सची भूमिका! तरी बॉक्स ऑफिसवर आपटला हा सिनेमा