TRENDING:

ज्या सिनेमाला दिलं म्युझिक, तोच 'छावा' समाजात फूट पाडणारा, ए.आर.रहमान यांचं शॉकिंग स्टेटमेन्ट

Last Updated:
A R Rehman on Chhaava : ज्या छावा सिनेमाला ए.आर.रेहमान यांनी संगीत दिलं. तोच सिनेमा समाजात फूट पाडणारा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ए.आर.रेहमान यांचं स्टेटमेन्ट चर्चेत आलं आहे.
advertisement
1/9
'छावा' समाजात फूट पाडणारा... ए.आर.रहमान यांचं शॉकिंग स्टेटमेन्ट
2025 वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या काही सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे छावा. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. अभिनेता विक्की कौशलनं या सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारली होती. सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची कथा दाखवण्यात आली होती.
advertisement
2/9
सिनेमाचा शेवट प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. सिनेमाचं म्युझिक अंगावर काटा आणणारं ठरलं. ऑस्कर विजेते संगीत दिग्दर्शक ए.आर. रहमान यांनी सिनेमाला संगीत दिलं होतं. त्यांच्या संगीतावर काहीअंशी टीका देखील करण्यात आली होती.
advertisement
3/9
दरम्यान 'छावा' सिनेमा समाजात फूट पाडणारा सिनेमा असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. ए.आर.रहमान नेमकं काय म्हणालेत?
advertisement
4/9
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ए.आर.रहमान म्हणाले, "काही सिनेमे वाईट हेतून तयार केले जातात. असे सिनेमे टाळण्याचा मी प्रयत्न करतो."
advertisement
5/9
"तो ( छावा ) फूट पाडणारा सिनेमा आहे. माझ्यामते मतभेदांचा फायदा त्याला मिळाला. पण मला वाटतं शौर्य दाखवणं हा या सिनेमाचा गाभा आहे. कारण मी त्या दिग्दर्शकाला विचारलं होतं की संगीत देण्यासाठी तुम्हाला माझी गरज का आहे? ते मला म्हणाले, यासाठी आम्हाला फक्त तुम्हीच हवे आहात."
advertisement
6/9
"माझ्यामते सिनेमाचा शेवट खिळवणारा आहे. पण आपल्याला वाटतं त्यापेक्षा लोक हुशार असतात असं माझं मत आहे. तुम्हाला असं वाटकं की सिनेमांचा लोकांवर प्रभाव पडेल? तुम्हाला असं वाटतं की काय खरं आहे काय खोटं. सांगितलं जातंय हे सांगणारा आतला आवाज प्रत्येकाला असतो."
advertisement
7/9
ए.आर.रहमान सिनेमाविषयी बोलताना पुढे म्हणाले, "छावामधील पात्र अतिशय प्रसिद्ध आहेत. ती प्रत्येक मराठ्याच्या रक्तात आहे. सिनेमा संपल्यानंतर मुलींनी किती सुंदर कविता म्हटल्या, हे किती भारावून टाकणारं होतं."
advertisement
8/9
"लोकांना अशाप्रकारे भावणाऱ्या, प्रत्येक मराठी व्यक्तीच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या सिनेमाला संगीत देणं हे माझं भाग्य आहे."
advertisement
9/9
छावा सिनेमाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. सिनेमा ऐकूण 797.34 कोटींची कमाई करण्यात यश मिळवलं. 2025 वर्षांत सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी छावा हा एक सिनेमा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ज्या सिनेमाला दिलं म्युझिक, तोच 'छावा' समाजात फूट पाडणारा, ए.आर.रहमान यांचं शॉकिंग स्टेटमेन्ट
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल