TRENDING:

Safety Pin : सेफ्टी पिनला लहान Loop का असतो? 99 टक्के लोकांना माहित नसेल त्यामागचं कारण

Last Updated:
या छोट्याशा पिनचा शोध कसा लागला? तिला 'सेफ्टी' पिनच का म्हणतात? आणि तिच्या खालच्या बाजूला असलेल्या त्या छोट्या छिद्राचं (Spring Loop) महत्त्व काय? चला, आज या इवल्याशा पिनाचा रंजक इतिहास आणि तिचं विज्ञान जाणून घेऊया.
advertisement
1/7
Safety Pin ला लहान Loop का असतो? 99 टक्के लोकांना माहित नसेल त्यामागचं कारण
कधी साडीची पिन लावण्यासाठी, कधी फाटलेला कपडा लपवण्यासाठी तर कधी बटण तुटलं म्हणून बटणच्या जागी, तर कधी लहान मुलांच्या कपड्यांना आधार देण्यासाठी... आपल्या घरातली एक छोटीशी वस्तू नेहमीच 'संकटमोचक' म्हणून धावून येते. ती म्हणजे 'सेफ्टी पिन'. आकाराने अतिशय क्षुल्लक वाटणारी ही पिन प्रत्यक्षात अभियांत्रिकीचा (Engineering) एक उत्तम नमुना आहे, हे तुमच्या लक्षात आलंय का?
advertisement
2/7
केवळ 5 रुपयांना 10-25 नग मिळणारी ही पिन नसेल, तर ऐनवेळी आपली किती फजिती होऊ शकते, याचा अनुभव आपल्या सर्वांनाच कधी ना कधी आला असेल. पण या छोट्याशा पिनचा शोध कसा लागला? तिला 'सेफ्टी' पिनच का म्हणतात? आणि तिच्या खालच्या बाजूला असलेल्या त्या छोट्या छिद्राचं (Spring Loop) महत्त्व काय? चला, आज या इवल्याशा पिनाचा रंजक इतिहास आणि तिचं विज्ञान जाणून घेऊया.
advertisement
3/7
सेफ्टी पिनचा इतिहास तसा खूप जुना आहे. लॅटिन भाषेत याला 'फिबुले' (Fibulae) असं म्हटलं जायचं. असा मानला जातं की, युरोपमध्ये कांस्य युगापासून (Bronze Age) अशा प्रकारच्या पिनचा वापर होत होता. मात्र, आज आपण जी आधुनिक स्प्रिंग असलेली पिन वापरतो, तिचा शोध 1849 मध्ये वॉल्टर हंट (Walter Hunt) यांनी लावला. त्यांनी एका साध्या तारेला विशिष्ट पद्धतीने वाकवून ही स्प्रिंग-लोडेड रचना तयार केली होती.
advertisement
4/7
पिन बनवण्याच्या दोन प्राचीन पद्धतीपूर्वीच्या काळी या पिन तयार करण्याच्या दोन मुख्य पद्धती जगभरात प्रसिद्ध होत्या:1. उत्तर युरोपीय पद्धत: या पद्धतीत सुईचे दोन वेगवेगळे भाग असायचे. यात स्प्रिंग नसायची. एका बाजूला छिद्र असायचे आणि दुसरी सुई त्यातून जाऊन हुकला जोडली जायची. ही रचना वापरण्यासाठी अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीची होती.
advertisement
5/7
2. मध्य युरोपीय आणि ग्रीक पद्धत: ही पद्धत आजच्या आधुनिक सेफ्टी पिनसारखीच होती. यात एकाच तारेचा वापर करून मधल्या भागात 'स्प्रिंग' दिली जायची. यामुळे पिनमध्ये लवचिकता यायची आणि ती वापरणं सोपं व्हायचं.
advertisement
6/7
तुम्ही कधी विचार केलाय का की, सेफ्टी पिनच्या खालच्या बाजूला तार गोलाकार का वळवलेली असते? ते केवळ डिझाईन नसून त्या पिनचं इंजिन आहे. हे गोलाकार लूप एका स्प्रिंगसारखं काम करतं. जेव्हा आपण पिन बंद करतो, तेव्हा हे लूप तारेवर एक विशिष्ट प्रकारचा ताण (Tension) निर्माण करतं. या ताणामुळेच पिनचं टोक वरच्या टोपणमध्ये घट्ट बसून राहतं. जर ही स्प्रिंग नसेल, तर पिन वारंवार स्वतःहून उघडेल आणि टोचून आपल्याला जखम होऊ शकते. म्हणूनच याला 'सेफ्टी' पिन असं नाव देण्यात आलं आहे.
advertisement
7/7
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी सेफ्टी पिन वापराल, तेव्हा लक्षात ठेवा की तुमच्या हातात 1800 च्या दशकातील एक महान शोध आहे. दिसायला साधी पण कामात अत्यंत प्रभावी असलेली ही पिन आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Safety Pin : सेफ्टी पिनला लहान Loop का असतो? 99 टक्के लोकांना माहित नसेल त्यामागचं कारण
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल