TRENDING:

Throwback : भारताचा पराभव जिव्हारी लागला, क्रिकेटचा सामना पाहताना अभिनेत्यानं जीव गमावला

Last Updated:
Actor Shocking Death : मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू चटका लावणारा होता. क्रिकेट मॅच पाहताना अभिनेत्याचा मृत्यू झाला.
advertisement
1/11
भारताचा पराभव जिव्हारी लागला, क्रिकेटचा सामना पाहताना अभिनेत्यानं जीव गमावला
मागील काही दिवसांत मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी चाहत्यांसाठी चटका लावणारी होती.
advertisement
2/11
पण तुम्हाला माहिती आहे का 29 वर्षांआधी अशाच एका फेमस मराठी अभिनेत्याने चटका लावणारी एक्झिट घेतली होती. या अभिनेत्याच्या जाण्यानं संपूर्ण इंडस्ट्री हळहळली. क्रिकेट मॅच पाहताना या अभिनेत्याचा मृत्यू झाला होता.
advertisement
3/11
या अभिनेत्यानं मराठीच नाही तर हिंदी सिमेसृष्टीतही आपलं नाव कमावलं होतं. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार हे क्रिकेट प्रेमी आहेत, तसाच हा अभिनेता सुद्धा क्रिकेटप्रेमी होता.
advertisement
4/11
या अभिनेत्याचं नाव शफी इनामदार. ते क्रिकेटचे मोठे चाहते होते. पण या अभिनेत्याचं क्रिकेटवरील प्रेमच त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं. 1996 च्या वर्ल्ड कपची फायनल पाहताना अभिनेत्याचा मृत्यू झाला.
advertisement
5/11
मॅचमध्ये भारताच्या पराभव झाला. हा धक्का ते पचवू शकले नाहीत. हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
6/11
13 मार्च 1996 रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात वर्ल्ड कप फायनल चालू होती. शफी इनामदार हा सामना अत्यंत उत्साहाने पाहत होते. पण भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
advertisement
7/11
त्यांच्या मित्रमंडळींनी सांगितले की, क्रिकेट त्यांचं पहिलं प्रेम होतं. शूटिंगदरम्यान सुद्धा ते स्कोअर विचारायचे आणि ब्रेक मिळाला की मॅच बघत बसायचे.
advertisement
8/11
शफी इनामदार यांचा जन्म रत्नागिरीतील दापोली येथे झाला. ते कोकणी कुटुंबातील होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईत आले आणि नाट्यक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. मराठी आणि गुजराती रंगभूमीवर त्यांनी सुरुवात केली. आपल्या अभिनयानं त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
advertisement
9/11
सामाजिक विषयांवर आधारित त्यांच्या नाटकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांनी भारतीय लोक रंगभूमी संघटना आणि राष्ट्रीय रंगभूमीसारख्या प्रतिष्ठित मंचांवरही काम केलं.
advertisement
10/11
'विजेता', 'अर्ध सत्य', 'अनोखा रिश्ता', 'सदा सुहागन', 'नजराणा' आणि 'अमृत' सारख्या सिनेमात त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. दूरदर्शनवरील 'ये जो है जिंदगी' या मालिकेमुळे ते घराघरात लोकप्रिय झाले. 1995 मध्ये त्यांनी 'हम दोनो' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. ज्यात नाना पाटेकर, ऋषी कपूर आणि पूजा भट्ट हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.
advertisement
11/11
मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री भक्ती बर्वे या त्यांची पत्नी होत्या. दोघांनी मराठी आणि गुजराती रंगभूमीवर काम केलं होतं. शफी इनामदार यांच्यावर 5 वर्षांनी भक्ती बर्वे यांचंही निधन झालं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Throwback : भारताचा पराभव जिव्हारी लागला, क्रिकेटचा सामना पाहताना अभिनेत्यानं जीव गमावला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल