विजय निश्चित, उज्ज्वल भविष्य! घटस्फोटाच्या वादात थलापती विजयची पहिलीच पोस्ट
- Published by:Priya Lad
Last Updated:
Thalapathy Vijay : पत्नी संगीता सोर्नालिंगमने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेनंतर अभिनेत थलापती विजयने त्याची पहिली सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
1/7

साऊथ सुपरस्टार थलापती विजय आणि त्याची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांचा घटस्फोट होत आहे. संगीताने थलापतीवर गंभीर आरोप करत घटस्फोटाची मागणी केली आहे.
advertisement
2/7
घटस्फोटाच्या याचिकेत संगीताने आरोप केला आहे की विजयचे एका अभिनेत्रीसोबतचे विवाहबाह्य संबंध आहेत. एप्रिल 2021 पासून सुरू असलेल्या या नात्यामुळे संगीताला तीव्र भावनिक त्रास आणि मानसिक त्रास झाला.
advertisement
3/7
संगीताने सांगितलं की, तिला विजयच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कळलं आणि संगीताने याबाबत विजयला विचारलं तेव्हा विजयने तिला तो हे नातं संपवेल असं आश्वासन दिलं होतं. पण हे नातं सुरूच राहिलं आणि आता परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
advertisement
4/7
विजयने अद्याप या आरोपांबद्दल कोणतंही उघड किंवा अधिकृत विधान केलेलं नाही. पण या वादानंतर त्याने पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. पत्नी संगीताने घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर थलापतीची ही पहिलीच सोशल मीडिया पोस्ट आहे.
advertisement
5/7
एक्स अकाऊंटवर त्याने पोस्ट केली आहे, ज्यात त्याने तामिळनाडू आणि पुडुचेरीमधील बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना उद्याचं उज्जवल भविष्य म्हणत तणाव आणि भीतीशिवाय परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्यास प्रोत्साहित केलं आहे. विजय निश्चित असल्याचं त्याने सांगितलं आहे.
advertisement
6/7
विजयने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून घटस्फोट किंवा नातेसंबंधांच्या वादावर थेट भाष्य केलं नसलं तरी वादानंतरची त्याची ही पहिली सोशल मीडिया पोस्ट घटस्फोटाच्या मुद्द्यावर थेट लक्ष केंद्रीत करण्याऐवजी वाद विचलित करणं आणि सकारात्मकता पसरवणं हे आहेत हे स्पष्ट आहे.
advertisement
7/7
संगीता ही विजयची फॅन होती. पहिल्या भेटीनंतर मैत्री, प्रेम आणि मग लग्न झालं. 1998 मघ्ये रजिस्टर आणि 1999 मध्ये त्यांनी विधींनुसार लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. संगीताने याचिकेत घरात राहण्याचा अधिकार आणि योग्य समतुल्य निवासस्थान तसंच पतीचं उत्पन्न आणि सामाजिक स्थितीनुसार कायमस्वरूपी पोटगी मिळावी अशी मागणी केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
विजय निश्चित, उज्ज्वल भविष्य! घटस्फोटाच्या वादात थलापती विजयची पहिलीच पोस्ट