जितेंद्रची हिरोईन, 25 व्या वर्षी झाली विधवा; दुसऱ्या लग्नात होती 7 महिन्यांची प्रेग्नंट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवुडची ती अत्यंत सुंदर अभिनेत्री जी अवघ्या 25 व्या वर्षी विधवा झाली. नंतर 37 व्या वर्षी तिच्या दुसऱ्या नवऱ्याचंही निधन झालं. या अभिनेत्रीने संजीव कुमार, किशोर कुमार आणि जितेंद्र यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
advertisement
1/8

हिंदी चित्रपटसृष्टीतील ती अभिनेत्री जिने जितेंद्रसोबत 'हमजोली' (1970), 'बिदाई' (1978) आणि 'सरफरोश' (1985) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती 'हमजोली' मध्ये जितेंद्रची मुख्य नायिका होती.अभिनेत्रीचं खरं आयुष्य खूप वेदनादायी होतं.
advertisement
2/8
बॉलिवुडच्या जगात अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या पण काही चेहरे असे आहेत जे त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या आयुष्यातील चढउतारांमधुळे नेहमीच लक्षात राहतात. 70 च्या दशकातील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री लीना चंदावरकर देखील त्यापैकी एक आहे.
advertisement
3/8
लीना यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिच्या खऱ्या आयुष्याची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हती. ती खूप लहान वयात विधवा झाली. तीही एकदा नाही तर दोनदा. वयाच्या 25 व्या वर्षी लीना चंदावरकरने गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा मुलगा सिद्धार्थशी लग्न केले. काही काळानंतर त्यांचे निधन झाले.
advertisement
4/8
लग्नापूर्वी जेव्हा ती किशोर कुमारला भेटली तेव्हा अभिनेता संजीव कुमारने तिला विनोदाने सांगितले की लीनाने त्याला राखी बांधावी, अन्यथा तो लग्न करेल. त्यावेळी कोणालाही माहित नव्हते की हा विनोद एके दिवशी खरा ठरेल.
advertisement
5/8
1988 साली वयाच्या 37व्या वर्षी लीनाने किशोर कुमारशी लग्न केलं. काही काळानंतर किशोर कुमारचं निधन झालं आणि लीना दुसऱ्यांदा विधवा झाली. लीना चंदावरकरचा जन्म 29 ऑगस्ट 1950 रोजी कर्नाटकातील धारवाड शहरातील एका कोकणी मराठी कुटुंबात झाला. तिचे कुटुंब सुशिक्षित आणि शिस्तप्रिय होते. तिचे वडील लष्करी अधिकारी होते. लीनाला लहानपणापासूनच कलेची आवड होती आणि ती अनेकदा शालेय नाटकांमध्ये भाग घेत असे.
advertisement
6/8
1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुनील दत्तच्या 'मन का मीत' या चित्रपटात तिला विनोद खन्ना यांच्यासोबत काम मिळालं. हा तिचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट केवळ हिट झाला नाही तर लीना चंदावरकर यांना चित्रपटसृष्टीत एक मजबूत ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.
advertisement
7/8
लीनाने तिच्या कारकिर्दीत 1970 आणि 80च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळजवळ प्रत्येक मोठ्या अभिनेत्यासोबत काम केले. तिने 'हमजोली', 'हनीमून', 'मेहबूब की मेहंदी', 'मंचली', 'दिल का राजा', 'एक महल हो सपनो का', 'बिदाई', 'प्रीतम', 'बैराग', 'कैद' आणि 'यारों का यार' सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं.
advertisement
8/8
लीनाने 1980 मध्ये किशोर कुमारशी लग्न केलं त्यावेळी ती प्रेग्नंट होती. लीना आणि किशोर कुमार यांनी दोन वेळा लग्न केलं होतं. एक नोंदणीकृत लग्न होते आणि दुसरे हिंदू रितीरिवाजांनुसार. 1977 मध्ये सिनेप्लॉटला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत लीनाने खुलासा केला की तिच्या हिंदू लग्नादरम्यान ती सात महिन्यांची प्रेग्नंट होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
जितेंद्रची हिरोईन, 25 व्या वर्षी झाली विधवा; दुसऱ्या लग्नात होती 7 महिन्यांची प्रेग्नंट