Guess Who : ट्रेनने जायची, वॉशरुममध्ये बदलायची कपडे, आता इतक्या कोटींची मालकीण आहे ही मराठीमोळी अभिनेत्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जी मॉलच्या वॉशरूममध्ये कपडे बदलून ऑडिशन द्यायला जायची. आज तीच अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण आहे. कोण आहे ही?
advertisement
1/8

अभिनेत्री होणं हे अनेक मुलींचं स्वप्न असतं. पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. अभिनेत्री व्हायचं म्हटल्यावर अनेक मुलींच्या घरून पाठिंबा मिळत नाही.
advertisement
2/8
अशीच एक मराठी अभिनेत्री जिनं हिंदीच नाही तर साऊथमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली. ही अभिनेत्री आज कोट्यवधींची मालकीण आहे पण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली.
advertisement
3/8
या अभिनेत्रीनं तिचा सुरूवातीच्या काळात ट्रेनने प्रवास करायची. तिला आधी क्राइम रिपोर्टर व्हायचं होतं. तिने पत्रकारितेत शिक्षण घेतलं. तिला क्राइल रिपोर्टर व्हायचं होतं.
advertisement
4/8
तिला अभिनेत्री व्हायचं होतं पण तिच्या कुटुबीयांनी हे मान्य नव्हतं. अभिनयाच्या वेडाचा तिच्या करिअरवर परिणाम होईल असं त्यांना वाटत होतं. पण कॉलेज सांभाळून तिने अभिनय केला.
advertisement
5/8
अभिनेत्रीच्या आई-वडिलांना तिने मराठी सिनेमांत काम करावं असं वाटतं होतं. पण अभिनेत्रीचं नशीब सर्वात आधी साऊथ सिनेमांमध्ये चमकलं. साऊथनंतर तिने बॉलिवूडमध्येही काम केलं. त्याचबरोबर काही मराठी सिनेमांची गाणी देखील तिने केली आहेत.
advertisement
6/8
आपण बोलत आहोत ती मराठी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. तिने एका मुलाखतीत बोलताना तिच्या स्ट्रगल काळाबद्दल सांगितलं होतं. मृणाल लोकलने प्रवास करायची. काम मिळत नसल्याने ती निराश असायची तेव्हा त्याच लोकलमधून तिला उडी मारून जीव देण्याची इच्छा व्हायची.
advertisement
7/8
मृणाल मुंबईमध्ये राहायची. वडाळ्याला ट्रेन पकडून ती अंधेरीला जायचे. ऑडिशनला जात असताना वेळ म्हणून ती ट्रेनने प्रवास करायची. ट्रेनने अंधेरी स्टेशनला उतरून तिथून बसने इन्फिनिटी मॉलला उतरायची. इन्फिनिटी मॉलला पोहोचल्यानंतर ती मॉलच्या वॉशरूममध्ये कपडे बदलायची आणि त्यानंतर ऑडिशनला जायची.
advertisement
8/8
कधी ट्रेन प्रवास करणारी, मॉलच्या वॉशरूममध्ये कपडे बदलणारी मृणाल ठाकूर आज बॉलिवूडची सक्सेसफुल अभिनेत्री आहे. लव सोनिया, सुपर 30, बाटला हाऊस,घोस्ट स्टोरीज, तूफान, धमाका, जर्सी, गुमराह, सन ऑफ सरदार 2 सारख्या सिनेमात तिने काम केलं आहे. मृणाल आज जवळपासू 39 कोटींहून अधिक संपत्तीची मालकीण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : ट्रेनने जायची, वॉशरुममध्ये बदलायची कपडे, आता इतक्या कोटींची मालकीण आहे ही मराठीमोळी अभिनेत्री