TRENDING:

Actress Life: 4 अफेअर, 3 लग्न, तरीही प्रेमात फ्लॉप; एका रात्रीत स्टार झालेली ही अभिनेत्री कोण?

Last Updated:
Actress Life: 80 च्या दशकात बॉलिवूडमध्ये एका अभिनेत्रीने एंट्री घेतली आणि एका रात्रीत ती स्टार बनली. हिट सिनेमे दिले मात्र प्रेमात मात्र ती फ्लॉप झाली. 4 अफेअर आणि 3 लग्नानंतरही तिला एकटेपणातच दिवस घालवावे लागले.
advertisement
1/7
4 अफेअर, 3 लग्न, तरीही प्रेमात फ्लॉप; एका रात्रीत स्टार झालेली ही अभिनेत्री कोण?
80 च्या दशकात बॉलिवूडमध्ये एका अभिनेत्रीने एंट्री घेतली आणि एका रात्रीत ती स्टार बनली. हिट सिनेमे दिले मात्र प्रेमात मात्र ती फ्लॉप झाली. 4 अफेअर आणि 3 लग्नानंतरही तिला एकटेपणातच दिवस घालवावे लागले.
advertisement
2/7
आपण बोलत असलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सलमा आगा आहे. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘निकाह’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.
advertisement
3/7
सलमा आगा ही केवळ अभिनेत्री नव्हती तर एक उत्तम गायिकाही होती. तिने अनेक हिंदी चित्रपटांना आपला आवाज दिला आणि लोकप्रिय गाणी दिली. ‘निकाह’नंतर ती ‘कसम पैदा करने वाले की’, ‘पती पत्नी और तवैफ’, ‘फूलन देवी’, ‘कोब्रा’, ‘उंचे लोग’ यांसारख्या चित्रपटांत झळकली. हिंदीसोबतच पाकिस्तानी चित्रपटांमध्येही ती काम करून प्रशंसा मिळवली.
advertisement
4/7
त्या काळात सलमा आगा सुंदर, प्रतिभावान आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. पण जिथे करिअरमध्ये तिला यश मिळालं, तिथेच वैयक्तिक आयुष्यात मात्र तिला पराभव आणि अपयशाचाच सामना करावा लागला.
advertisement
5/7
सलमा चार वेळा प्रेमात पडली आणि तीनदा लग्न केले, पण प्रत्येक वेळेला तिचा प्रवास तुटलेला राहिला. सुरुवातीला न्यूयॉर्कमधील व्यापारी मेहमूद सिप्रासोबत तिचं नातं जमलं, पण ते तुटलं. त्यानंतर पाकिस्तानी अभिनेता मेहमूदसोबत संबंध आले, पण इथेही निराशा मिळाली.
advertisement
6/7
नंतर तिने अभिनेता जावेद शेखशी लग्न केले. तिनं त्याच्यासाठी अनेक तडजोडी केल्या, पण हे लग्न तीन वर्षांतच संपलं. पुढे 1989 मध्ये तिनं स्क्वॅश खेळाडू रेहमत खानशी विवाह केला. या लग्नातून तिला दोन मुलं झाली. मात्र 2010 मध्ये या नात्याचा शेवट घटस्फोटात झाला.
advertisement
7/7
आज सलमा आगा 68 व्या वर्षी एकटीच राहते. ती क्वचितच लोकांसमोर दिसते. अभिनयापासून ती दूर आहे, पण अधूनमधून गझल किंवा गाणी रिलीज करते. एकेकाळी रुपेरी पडद्यावर राज करणारी ही अभिनेत्री आता एकाकी जीवन जगते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Actress Life: 4 अफेअर, 3 लग्न, तरीही प्रेमात फ्लॉप; एका रात्रीत स्टार झालेली ही अभिनेत्री कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल