Currency : भारतातील 100 रुपयाची किंमत दुबईमध्ये किती? तिकडचे 100 दिरहम आणले तर आपल्याला किती पैसे मिळतील?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
100 rupees in Dubai : भारताची करंसी जशी रुपये आहे तसं दुबईमध्ये दिरहम (AED) चालतं. म्हणजे तिकडचे पैसे दिरहममध्ये मोजतात.
advertisement
1/7

दुबई हा जगभरातील लोकांना आकर्षित करणारा एक सुंदर आणि आधुनिक शहर आहे. गगनचुंबी इमारती, आलिशान जीवनशैली, वाळवंट सफारी, शॉपिंग मॉल्स आणि समुद्रकिनारे यामुळे दुबईचे नाव नेहमीच चर्चेत असते. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाही या शहरात आहे आणि ती दुबईच्या सौंदर्याचे प्रतीक मानली जाते. मात्र, दुबई केवळ पर्यटनासाठीच प्रसिद्ध नाही, तर इथले कठोर कायदेही वेगळ्या पद्धतीने ओळखले जातात.
advertisement
2/7
आता प्रश्न असा की, दुबईमध्ये भारतीय रुपयाची किंमत किती आहे?भारताची करंसी जशी रुपये आहे तसं दुबईमध्ये दिरहम (AED) चालतं. म्हणजे तिकडचे पैसे दिरहममध्ये मोजतात.
advertisement
3/7
15 सप्टेंबर 2025 रोजीच्या चलन विनिमय दरानुसार, 1 भारतीय रुपया (INR) सुमारे 0.042 दिरहम (AED) एवढा आहे.
advertisement
4/7
म्हणजेच 100 भारतीय रुपये = 4.16 दिरहम. त्याचप्रमाणे, 100 दिरहमची किंमत भारतात अंदाजे 2403 रुपये होते. मात्र, हे दर रोज बदलत असल्याने प्रवासापूर्वी चालू विनिमय दर तपासणे गरजेचे आहे.
advertisement
5/7
दुबईमध्ये फिरण्यासाठी लागणारा खर्चएका पर्यटकाला दररोज साधारण 300 ते 2,000 दिरहम खर्च येतो.दोन लोकांसाठी हा खर्च साधारण 800 ते 5,000 दिरहम पर्यंत पोहोचू शकतो.बजेट प्रवासी असल्यास निवासाचा खर्च प्रति व्यक्ती 200 दिरहम पर्यंत राहतो.
advertisement
6/7
आलिशान हॉटेलमध्ये राहायचे असल्यास हा खर्च प्रति व्यक्ती दररोज 2,500 दिरहम इतका जाऊ शकतो.वाहतूक खर्च बस किंवा टॅक्सीवर अवलंबून असतो, जो दररोज साधारण 30 ते 150 दिरहम पर्यंत होतो.
advertisement
7/7
म्हणजेच, दुबईची सफर करण्यापूर्वी केवळ चलनाचा दरच नाही, तर तुमच्या बजेटनुसार खर्च किती होईल हे ठरवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Currency : भारतातील 100 रुपयाची किंमत दुबईमध्ये किती? तिकडचे 100 दिरहम आणले तर आपल्याला किती पैसे मिळतील?