अनेक दिवस हाताला पट्टा लावून फिरतेय, अभिनेत्री वल्लरी विराजला नेमकं झालंय काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Vallari Viraj Hand Injury : नवरी मिळे हिटलरला फेम अभिनेत्री वल्लरी विराज गेली अनेक दिवस हाताला पट्टा लावून आहे. तिच्या हाताला नेमकं काय झालं आहे?
advertisement
1/8

'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वल्लरी विराज. ही मालिका संपल्यानंतर तिची 'शुभ श्रावणी' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला. वल्लरीला पुन्हा टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे.
advertisement
2/8
वल्लरी ही सोशल मीडियावरही सक्रीय असते. अभिनेत्री आलापिनीसोबत तिचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ वल्लरीने शेअर केला आणि तो पाहून चाहत्यांना शॉक बसला. कारण त्यात वल्लरीच्या हाताला प्लास्टर करण्यात आलं होतं.
advertisement
3/8
अभिनेत्री वल्लरी विराज गेली अनेक दिवस हात गळ्यात घालून व्हिडीओ करताना दिसतेय. एका हाताने मुमेन्ट आणि चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्सने वल्लरीने चाहत्यांची मनं जिंकली.
advertisement
4/8
पण वल्लरीच्या हाताला नेमकं झालंय काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला. तिला अनेक प्रश्न देखील विचारले गेले होते. अखेर वल्लरीनं चाहत्यांना तिच्या हाताला नेमंक काय झालं हे सांगितलं.
advertisement
5/8
पण वल्लरीच्या हाताला नेमकं झालंय काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला. तिला अनेक प्रश्न देखील विचारले गेले होते. अखेर वल्लरीनं चाहत्यांना तिच्या हाताला नेमंक काय झालं हे सांगितलं.
advertisement
6/8
वल्लरीच्या खांद्याला दुखापत झाली असून पुढचे काही दिवस तिला पट्टी बांधून राहावं लागणार असल्याचं तिने सांगितलं. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी तिच्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. पण चिंता करण्याचं कारण नाही, मी रिकव्हर करत आहे, सेटवर माझी खूप काळजी घेतली जात आहे असं वल्लरीने सांगितलं.
advertisement
7/8
वल्लरीची 'शुभ-श्रावणी' ही मालिका येत्या 19 जानेवारीपासून झी मराठीवर संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळणार आहे. यात ती श्रावणी ही भूमिका साकारत आहे.
advertisement
8/8
श्रावणी ही एका शिक्षणमंत्र्याची मुलगी आहे. तिची आई बालपणी मृत्यू पावली. तिच्या बाबांनी तिच्याकडे लहानपणापासून पाहिलेलं नाही. वडिलांचं मन जिंकण्याचा श्रावणीचा नेहमी प्रयत्न असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अनेक दिवस हाताला पट्टा लावून फिरतेय, अभिनेत्री वल्लरी विराजला नेमकं झालंय काय?