अवघ्या 3 वर्षांची आराध्या बच्चन म्हणाली 'तो' शब्द, ऐकून हैराण झाली आई ऐश्वर्या
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बच्चन कुटुंबाची नात आराध्या बच्चन नेहमीच चर्चेत राहिली आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी आराध्या कोणता शब्द बोलायला शिकली माहिती आहे? आई ऐश्वर्यानेच याचा खुलासा केला आहे.
advertisement
1/7

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन दोघीही एकत्र अनेक ठिकाणी स्पॉट होत असतात. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी 2007मध्ये लग्न केलं. लग्नाच्या चार वर्षांनी दोघांना मुलगी झाली.
advertisement
2/7
आराध्या ही अभिषेक आणि ऐश्वर्याची एकुलती एक लाडकी मुलगी आहे. घरात आराध्यावर खूप चांगले संस्कार होत आहेत. आराध्याही हुशार असल्याचं ऐश्वर्या सांगते. आराध्या अवघी तीन वर्षांची असताना एक महत्त्वाची गोष्ट शिकली.
advertisement
3/7
पॅरिसमध्ये एका इव्हेंटमध्ये ऐश्वर्याला विचारण्यात आलं की, "आराध्या कधी खेळता खेळता तिचा मेकओव्हर करते का?" ऐश्वर्या म्हणाली, "आराध्या अजून लहान आहे. ती नेहमी मला मेकअप करताना पाहते. मी माझ्याजवळ बसून राहते कधीच दुसऱ्या खोलीत जात नाही".
advertisement
4/7
ऐश्वर्या म्हणाली, "मी माझा मेकअप संपला की आराध्याला सांगते मी ऑफिसला चालले आहे. हे रुटिन यासाठी की तिला समजावं तयार होणं आणि मेकअप करणं हा तिच्या आईच्या कामाचा एख भाग आहे".
advertisement
5/7
ऐश्वर्यानं सांगितलं, "आराध्या तीन वर्षांची असताना मेकअप हा शब्द बोलायला शिकली. मी मिस वर्ल्डनंतर घरी आले आणि माझा मेकअप काढत होते तेव्हा आराध्याने मला विचारलं की तू काय करत आहेस? मी तिला म्हणाली, चेहरा स्वच्छ करत आहे".
advertisement
6/7
"हे पाहून ती हैराण झाली कारण तिला आधीपासून मेकअप हा शब्द माहिती होता. ती मला म्हणाली, तू मेकअप काढत आहे".
advertisement
7/7
" मला कळून चुकलं की ती आता मोठी होत आहे आणि तिला दुनियादारी कळत आहे. पण आतापर्यंत माझ्या मेकअपबरोबर कोणताही एक्सपेरिमेंट झालेला नाही".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अवघ्या 3 वर्षांची आराध्या बच्चन म्हणाली 'तो' शब्द, ऐकून हैराण झाली आई ऐश्वर्या