TRENDING:

Bollywood Actor : एक फ्लाइट चुकली अन् आयुष्यच बदलंल, वेटरचं काम करणारा अभिनेता थेट सुपरस्टार झाला

Last Updated:
Bollywood Actor : एका चुकलेल्या फ्लाइटने एका वेटरचं आयुष्य पूर्णपणे बदलंल आणि तो थेट रातोरात सुपरस्टार बनला.
advertisement
1/7
एक फ्लाइट चुकली अन् वेटरचं काम करणारा अभिनेता थेट सुपरस्टारच झाला
बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारने अॅक्शन, कॉमेडी आणि देशभक्तीपर अशा सर्वच जॉनरच्या चित्रपटांत चोख भूमिका निभावल्या आहेत. पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य एकाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही.
advertisement
2/7
वेटरपासून सुपरस्टार होण्यापर्यंतचा अक्षय कुमारचा प्रवास खूपच फिल्मी आहे. अक्षय कुमारचा जन्म 9 सप्टेंबर 1967 मध्ये अमृतसरमध्ये झाला. खिलाडी कुमारला मार्शल आर्ट्समध्ये रस असल्याने त्याने त्यांचं खास ट्रेनिंगदेखील घेतलं आहे. एकेकाळी बैंकॉकमध्ये त्याने वेटर आणि शेफ म्हणूनही काम केलं आहे.
advertisement
3/7
मार्शल आर्ट्सचं शिक्षण घेत असतानाच अक्षय कुमारला मॉडेलिंगची ऑफर मिळाली. मॉडेलिंगमध्ये संघर्ष करत असताना त्याने अभिनयक्षेत्रातही पाऊल ठेवलं. 1987 मध्ये त्याला एक छोटी भूमिका मिळाली पण ओळख मात्र मिळाली नाही. त्यानंतर 1992 मध्ये 'जो जीता वही सिकंदर'साठी त्याने ऑडिशन दिलं. पण त्याचं सिलेक्शन मात्र झालं नाही.
advertisement
4/7
अक्षय कुमारच्या नशिबात मात्र काहीतरी वेगळंच होतं. बंगळुरूतील एका फॅशन शोला जाण्यासाठीची अक्षयची फ्लाइट मिस झाली आणि निराश होऊन तो घरी परतला. त्याचदिवशी अक्षयची भेट नटराज स्टुडिओचे मेकअप मॅन नरेंद्र यांच्यासोबत झाली. या मेकअप मॅनने खिलाडीचा फोटो प्रमोद चक्रवर्ती यांना दाखवला. पुढे 'दीदार' या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अक्षयची निवड झाली. ज्यावेळी अक्षयची फ्लाइट होती त्याचवेळी चित्रपटासाठीचा पहिला चेक मिळणं हे अक्षयच्या नशिबातच होतं.
advertisement
5/7
अक्षय कुमारचा पहिला चित्रपट 'सौगंध' हा 1991 मध्ये प्रदर्शित झाला होता. पण त्याला खऱ्या अर्थाने ओळख 1992 मध्ये आलेल्या 'खिलाडी' या चित्रपटाने मिळाली. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट देत तो बॉलिवूडचा 'खिलाडी कुमार' झाला.
advertisement
6/7
अॅक्शनपटांसह अक्षयने कॉमेडी चित्रपटांतही आपल्या अभिनयाची छाप पाडली. 'हेरा फेरी' आणि 'गरम मसाला' सारख्या चित्रपटांत त्याच्या अभिनयाची वेगळी बाजू पाहायला मिळते. 'एयरफिल्ट','रुस्तम' सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्याने सामाजिक विषयांनादेखील हात घातला.
advertisement
7/7
क्षय कुमार आजच्या घडीला बॉलिवूडचा सर्वात फिट आणि प्रोफेशनल अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याची लाइफस्टाइल अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 'खिलाडी कुमार'च्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bollywood Actor : एक फ्लाइट चुकली अन् आयुष्यच बदलंल, वेटरचं काम करणारा अभिनेता थेट सुपरस्टार झाला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल