मुंबई : स्टाईल आणि वापर दोन्हीचा उत्तम मिलाफ असलेली बॅग ही प्रत्येक मुलीच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. मग ती ऑफिसला जाणारी असो, कॉलेजला जाणारी असो किंवा विकेंडला शॉपिंगला जाणारी – प्रत्येक प्रसंगानुसार वेगवेगळी बॅग असावी अशी इच्छा अनेकांची असते. आणि त्यामुळेच ‘स्वस्तात मस्त बॅग कुठे मिळेल?’ हा प्रश्न कायम मनात असतो.