TRENDING:

Akshaye Khanna साठी आता या फिल्मचे दरवाजे कायमचे बंद! निर्मात्याने स्पष्ट शब्दांत सांगितली ही गोष्ट

Last Updated:
Akshaye Khanna : अक्षय खन्नासाठी एका बहुप्रतीक्षित फिल्मचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत.
advertisement
1/7
Akshaye Khanna साठी आता या फिल्मचे दरवाजे कायमचे बंद!
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या 'धुरंधर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या सिनेमात त्याने साकारलेल्या रहमान डकैतच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं.
advertisement
2/7
अक्षय खन्नाने ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’मध्ये रहमान डकैतची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र त्यानंतर तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. आधी त्याने अजय देवगण स्टारर ‘दृश्यम 3’ मधून माघार घेतली आणि आता आणखी एका फ्रँचायझी चित्रपटातून त्याचा पत्ता कट झाला आहे.
advertisement
3/7
अक्षय खन्नाचा 'Race 4' या बहुप्रतीक्षित सिनेमातून पत्ता कट झाल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची चर्चा सुरू झाल्यापासूनच असा अंदाज वर्तवला जात होता की फ्रँचायझीच्या पहिल्या भागातील ओरिजिनल स्टार्स सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांचं यात कमबॅक होऊ शकतं. मात्र निर्माते रमेश तौरानी यांनी स्पष्ट केलं आहे की या चित्रपटात अक्षय खन्ना दिसणार नाही.
advertisement
4/7
रमेश तौरानी यांनी HT City सोबत बोलताना ‘Race 4’ मध्ये अक्षय खन्नाच्या एंट्रीच्या बातम्या फेटाळून लावल्या. ते म्हणाले,“नाही, आम्ही अक्षयला विचारणा केलेली नाही. त्याची काहीच शक्यता नव्हती.”
advertisement
5/7
अक्षय खन्नाच्या पात्राला ‘Race 4’ मध्ये परत आणण्यासाठी स्क्रिप्टमध्ये बदल केला जाईल असा काहींचा अंदाज होता. पण यावरही रमेश तौरानी यांनी स्थिती स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले,"त्याला परत आणण्याचा कोणताही विचार नाही. पहिल्या चित्रपटात त्याच्या पात्राचा अपघात झाला होता. त्याचा ट्रॅक तिथेच संपला होता आणि तो तसाच राहील".
advertisement
6/7
काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की ‘Race 4’ साठी सैफ अली खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना फायनल करण्यात आले आहे. मात्र निर्मात्याने ही बातमीही नाकारली. ते म्हणाले,"अजून कास्ट फायनल झालेली नाही. सध्या फक्त स्क्रिप्टवर काम सुरू आहे".
advertisement
7/7
‘Race’ फ्रँचायझीची सुरुवात 2008 मध्ये झाली. पहिल्या भागात सैफ अली खान आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत होते आणि हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. दुसरा भाग 2013 मध्ये ‘Race 2’ नावाने आला, ज्यात सैफ अली खान आणि जॉन अब्राहम होते, आणि तोही हिट ठरला. 2018 मध्ये ‘Race 3’ प्रदर्शित झाला, ज्यात सलमान खान मुख्य भूमिकेत होता. पहिल्या दोन भागांचे दिग्दर्शन अब्बास–मस्तान यांनी केले होते, तर तिसऱ्या भागाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा यांनी केले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Akshaye Khanna साठी आता या फिल्मचे दरवाजे कायमचे बंद! निर्मात्याने स्पष्ट शब्दांत सांगितली ही गोष्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल