TRENDING:

23 की 24 जानेवारी, वसंत पंचमीच्या डेटमध्ये कन्फ्युजन? 'ही' आहे करेक्ट तारीख; या दिवशी काहीही झालं तरी टाळा 'या' गोष्टी!

Last Updated:
हिंदू धर्मात 'वसंत पंचमी' हा सण ज्ञान, कला आणि बुद्धीची देवता माता सरस्वतीला समर्पित आहे. याच दिवशी माता सरस्वतीचे प्रकटिकरण झाले होते, अशी धार्मिक मान्यता आहे. दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. यंदा हा सण नेमका कोणत्या दिवशी आहे, याबाबत काहीसा संभ्रम पाहायला मिळत आहे.
advertisement
1/7
23 की 24 जानेवारी, वसंत पंचमीच्या डेटमध्ये कन्फ्युजन? 'ही' आहे करेक्ट तारीख
हिंदू धर्मात 'वसंत पंचमी' हा सण ज्ञान, कला आणि बुद्धीची देवता माता सरस्वतीला समर्पित आहे. याच दिवशी माता सरस्वतीचे प्रकटिकरण झाले होते, अशी धार्मिक मान्यता आहे. दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. यंदा हा सण नेमका कोणत्या दिवशी आहे, याबाबत काहीसा संभ्रम पाहायला मिळत आहे. पण पंचांगानुसार, 2026 मध्ये वसंत पंचमी शुक्रवार, 23 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे.
advertisement
2/7
काळे कपडे घालणे टाळा: वसंत पंचमीला पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. हा रंग ऊर्जेचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. या दिवशी काळे किंवा गडद रंगाचे कपडे घालणे अशुभ मानले जाते.
advertisement
3/7
झाडे-झुडपे तोडू नका: हा सण निसर्गाच्या उत्सवाचा आहे. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा दिवस असल्याने आजच्या दिवशी झाडांची पाने तोडणे किंवा झाडे कापणे महापाप मानले जाते.
advertisement
4/7
कोणाचाही अपमान करू नका: माता सरस्वती ही वाणीची देवता आहे. आजच्या दिवशी कुणाशीही वाद घालणे, खोटे बोलणे किंवा रागावणे टाळावे. आपल्या वाणीतून कोणाचेही मन दुखावू नका.
advertisement
5/7
मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य: हा सात्त्विकतेचा सण आहे. या दिवशी चुकूनही तामसिक अन्नाचे सेवन करू नये. शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे सात्त्विक अन्न ग्रहण करावे.
advertisement
6/7
सकाळी लवकर उठा आणि अंघोळ करा: अमावस्येप्रमाणेच वसंत पंचमीलाही ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करण्याचे महत्त्व आहे. उशिरा उठणे किंवा अस्वच्छ राहणे देवीला अप्रिय वाटते.
advertisement
7/7
पुस्तकांचा अनादर करू नका: विद्यार्थी आणि कलाकारांसाठी हा मोठा दिवस आहे. आजच्या दिवशी आपली पुस्तके, पेन किंवा वाद्ये अस्ताव्यस्त टाकू नका. त्यांची पूजा करावी आणि ज्ञानाचा आदर करावा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
23 की 24 जानेवारी, वसंत पंचमीच्या डेटमध्ये कन्फ्युजन? 'ही' आहे करेक्ट तारीख; या दिवशी काहीही झालं तरी टाळा 'या' गोष्टी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल