e-Vitara कधी होतेय लॉन्च? किती असेल मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची किंमत?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Maruti e Vitara Launch Date: मारुती सुझुकी e विटारा लवकरच इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतात लॉन्च करेल. जो नेक्सा नेटवर्कवर मिळेल. यामध्ये BYD बॅटरी, 543 किमी रेंज, लेव्हल 2 ADAS आणि भारत NCAP मध्ये फाइव्ह स्टार रेटिंग आहे. भारतात याची टक्कर एमजी विंडसर आणि टाटा नेक्सॉन ईव्हीने होईल जी वर्तमानात भारतात बेस्टसेलिंग इलेक्ट्रिक कार आहे.
advertisement
1/8

मुंबई : मारुती सुझुकीच्या भारतात आपली नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही E-विटारासोबत इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये पाऊल ठेवणार आहे. हा मिडसाइज इलेक्ट्रिक एसयूव्ही फक्त नेक्सा रिटेल नेटवर्कच्या माध्यमातून विकली जाईल. याची टक्कर देशातील सर्वात वेगाने वाढत्या ईव्ही सेगमेंटमध्ये हुंडई क्रेटा ईव्ही, महिंद्रा XEV 9e, एमजी ZS EV, टाटा कर्व्ह ईव्ही आणि इतर गाड्यांनी होईल. याची सुरुवातीची किमंत एक्स-शोरुम जवळपास 17 लाख रुपयांनी थोडी जास्त राहण्याची आशा आहे.
advertisement
2/8
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही घरगुती लॉन्चपूर्वी ही e-विटाचा प्रवास सुरु झाला आहे. मारुती सुजुकीच्या गुजरात प्लांटमध्ये याच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे आणि येथे तयार यूनिट्सला अनेक परदेशी बाजारात एक्सपोर्ट केला जात आहे.
advertisement
3/8
e विटाराला मारुतीच्या खास Heartect-e स्केटबोर्ड प्लेटफॉर्मवर तयार करण्यात आला आहे. याची लांबी 4,275 मिमी, रुंदी 1,800 मिमी आणि उंची जवळपास 1,640 मिमी आहे. व्हीलबेस 2,700 मिमीचा आहे. लोडच्या ग्राउंड क्लीयरेन्स जवळपास 185 मिमी राहण्याची आशा आहे. यामध्ये BYD ने दिली दोन LFP बॅटरी पॅकचा वापर केला गेला आहे.
advertisement
4/8
प्रोडक्ट डेव्हलपमेंसह कंपनीने आपल्या लॉन्ग टर्म ईव्ही इकोसिस्टम स्ट्रॅटेजीही तयारी केली आहे. ज्यामध्ये या दशकाच्या अंतापर्यंत देशभरात एक लाखांहून जास्त पब्लिक चार्जिंग पॉइट्स इंस्टॉल करण्याचं वचन दिलं आहे.
advertisement
5/8
लहान 48.8 kWh बॅटरीमध्ये 144 PS इलेक्ट्रिक मोटर आहे जी 192.5 Nm टॉर्क निर्माण करते, तर मोठी 61.1 kWh बॅटरी 174 PS पॉवर आणि तेवढाच टॉर्क निर्माण करते.
advertisement
6/8
दोन्ही व्हेरिएंट्समध्ये डीसी फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. ज्यामुळे 0 ते 80 टक्केपर्यंत बॅटरी फक्त 50 मिनिटांमध्ये चार्ज होते. मोठ्या बॅटरीसह एकदा चार्ज केल्यावर 543 किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंजचा दावा केला गेला आहे.
advertisement
7/8
फीचर्सविषयी बोलायचं झाल्यास यामध्ये 10.25 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळले. ज्यामध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, 10.1 इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पॉवर्ड फ्रंट सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसारखे फीचर्स मिळतील. सोबतच लेव्हल 2 ADAS ही मिळेल. ज्यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोलसारख्या सुविधा असतील.
advertisement
8/8
पाच सीटर एसयूव्ही भारत NCAP मध्ये फाइव्ह स्टार रेटिंग मिळवली आहे. अडल्ट सेफ्टीसाठी 32 मधून 31.49 आणि मुलांच्या सुरक्षेसाठी 49 मध्ये 43 अंक मिळाले आहेत. स्टँडर्ड सेफ्टी फीचर्समध्ये सात एअरबॅग्स, ईएससी, एबीएस विद ईबीडी आणि ISOFIX माउंट्सचा समावेश आहे. हे एकूण 11 पेंट स्कीम्समध्ये उपलब्ध असेल. ज्यामध्ये लँड ब्रीज ग्रीन विद BH ब्लॅक रुफ, स्प्लेंडिड सिल्व्हर विद BH ब्लॅक रुफ, ओप्यूलेंट रेड विद BH ब्लॅक रुफ, आर्केटिक व्हाइट विद BH ब्लॅक रुफ, नेक्सा ब्लू, ग्रँड्योर ग्रे, स्प्लेंडिड सिल्व्हर, आर्केटिक व्हाइट, ओप्यूलेंट रेड, BH ब्लॅक आणि लँड ब्रीज ग्रीन सामिल आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
e-Vitara कधी होतेय लॉन्च? किती असेल मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची किंमत?