TRENDING:

T20 World Cup : बांगलादेशला 48 तासांची डेडलाईन, वर्ल्ड कपमध्ये नव्या टीमची एन्ट्री! भारतात यायला बॅगही पॅक

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमधलं बांगलादेशचं स्थान धोक्यात आलं आहे. आयसीसीने बांगलादेशला 48 तासांची डेडलाईन दिली आहे. बांगलादेश वर्ल्ड कप खेळायला भारतात आली नाही, तर नवी टीम खेळायला तयार आहे.
advertisement
1/7
बांगलादेशला 48 तासांची डेडलाईन, वर्ल्ड कपमध्ये नव्या टीमची एन्ट्री! भारतात येणार
बांगलादेश टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार का नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतात येणार का नाही? याबाबतचा निर्णय 21 जानेवारी म्हणजेच पुढच्या 48 तासात घेण्याची डेडलाईन आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला दिली आहे.
advertisement
2/7
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्यांच्या टीमला भारतामध्ये खेळायला पाठवलं नाही तर आयसीसी बांगलादेशऐवजी दुसऱ्या टीमला भारतामध्ये वर्ल्ड कप खेळवण्यासाठी बोलवू शकते. या टीमचं नावही आता समोर आलं आहे.
advertisement
3/7
भारतामध्ये मॅच खेळा नाहीतर स्पर्धेतून बाहेर व्हा, असा सज्जड दम आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. बांगलादेशने सुरक्षेच्या कारणामुळे भारतात मॅच खेळायला नकार दिला आहे.
advertisement
4/7
भारताऐवजी टी-20 वर्ल्ड कपचे आमचे सामने श्रीलंकेमध्ये खेळवण्यात यावेत, अशी मागणी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे केली आहे. आयसीसीने मात्र ही मागणी फेटाळून लावली आहे.
advertisement
5/7
आयर्लंड टी-20 वर्ल्ड कपचे त्यांचे सगळे सामने श्रीलंकेमध्ये खेळणार आहे, त्यामुळे आपल्याला आयर्लंडच्या ग्रुपमध्ये टाकून आयर्लंडला आपल्या ग्रुपमध्ये टाकावं, अशी मागणीही बांगलादेशने केली होती, पण त्यांची ही मागणीही मान्य झाली नाही.
advertisement
6/7
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बुधवारपर्यंत निर्णय घेतला नाही, तर स्कॉटलंडची टीम बांगलादेशऐवजी टी-20 वर्ल्ड कप खेळेल. टी-20 वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय न झालेल्या टीमपैकी स्कॉटलंडची क्रमवारी सर्वोत्तम आहे, त्यामुळे स्कॉटलंड स्पर्धेत बांगलादेशऐवजी खेळू शकते.
advertisement
7/7
टी-20 वर्ल्ड कपला 7 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. ग्रुप सी मध्ये असलेल्या बांगलादेशच्या मॅच कोलकाता आणि मुंबईमध्ये होणार आहेत. बांगलादेशमधल्या हिंदूंवरच्या अत्याचाराच्या घटनांमुळे मुस्तफिजूर रहमानची आयपीएलमधून हकालपट्टी केली गेली, त्यानंतर बांगलादेशने भारतामध्ये वर्ल्ड कपचे सामने खेळायला नकार दिला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : बांगलादेशला 48 तासांची डेडलाईन, वर्ल्ड कपमध्ये नव्या टीमची एन्ट्री! भारतात यायला बॅगही पॅक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल