'माहिती नाही मी परत येईन की नाही', नेहा कक्करच्या आयुष्यात मोठं वादळ! Insta पोस्टने वाढवला चाहत्यांचा बीपी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Neha Kakkar : नेहा कक्करच्या आयुष्यात मोठं वादळ आल्याचं दिसतंय. तिच्या पोस्टनं चाहत्यांची चिंता वाढवली आहे. नेमकं झालंय काय?
advertisement
1/8

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. नेहा अनेकदा ट्रोलही होत असते. दरम्यान नेहा कक्करच्या आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. नेहाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
advertisement
2/8
गायिका नेहा कक्करने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलं की, की ती तिच्या सर्व जबाबदाऱ्या, रिलेशनशिप्स आणि कामापासून ब्रेक घेणार आहे. तिने नंतर पोस्ट डिलीट केली, परंतु ती डिलीट होण्यापूर्वीच ती व्हायरल झाली.
advertisement
3/8
नेहाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. "जबाबदारी, रिलेशनशिप्स, काम आणि सध्या माझ्या मनात असलेल्या सर्व गोष्टींपासून ब्रेक घेण्याची वेळ आली आहे. मला माहित नाही की मी परत येईन की नाही. थँक्यू."
advertisement
4/8
नेहा कक्करने तिच्या निर्णयामागील कारणांबद्दल सविस्तर माहिती दिली नाही. तिच्या पहिल्या पोस्टनंतर, नेहाने आणखी एक मेसेज शेअर केला. ज्यामध्ये विशेषतः चाहत्यांना आणि पापाराझींना तिच्या प्रायव्हसीचा आदर ठेवून तिचे फोटो किंवा व्हिडिओ काढू नये असं सांगितलं आहे.
advertisement
5/8
नेहाने पोस्टमध्ये लिहिलंय, "मी पापाराझी आणि चाहत्यांना माझे व्हिडीओ किंवा फोटो न काढण्याची मी विनंती करते. मला आशा आहे की तुम्ही माझ्या प्रायव्हसीचा आदर कराल. मला या जगात मुक्तपणे जगू द्याल. कृपया कॅमेरे नाहीत! माझ्या शांतीसाठी तुम्ही कमीत कमी हे करू शकता."
advertisement
6/8
मनोरंजक गोष्ट म्हणजे, नेहा कक्करने काही मिनिटांतच तिची सोशल मीडिया पोस्ट डिलीट केली, ज्यामुळे चाहते गोंधळले आणि अस्वस्थ झाले. तिची पोस्ट लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाली. नेहाला नेमकं झालंय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
advertisement
7/8
काही दिवसांआधी नेहा कक्कर तिच्या कँडी शॉप गाण्यामुळे ट्रोल झाली होती. या गाण्याबद्दल नेहा आणि तिचा भाऊ टोनी कक्कर यांच्या सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती.
advertisement
8/8
पण आता नेहाला काय झालं आहे? तिच्या करिअरमध्ये तिला कोणी त्रास देतंय? तिच्या वैयक्तिक आयुष्यात काही समस्या आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले असून त्यांची चिंता वाढली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माहिती नाही मी परत येईन की नाही', नेहा कक्करच्या आयुष्यात मोठं वादळ! Insta पोस्टने वाढवला चाहत्यांचा बीपी