IND vs NZ : गंभीरच्या फेवरेटने फिक्स केली टीम इंडियातली जागा, 32 व्या वर्षीच मॅच विनरचं करिअर संपवलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे, पण गौतम गंभीरच्या फेवरेट खेळाडूने त्याची टीम इंडियातली जागा निश्चित केली आहे.
advertisement
1/7

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा 41 रननी पराभव झाला आहे. याचसोबत भारताने 3 वनडे मॅचची ही सीरिज 2-1 ने गमावली आहे. विराट कोहलीच्या झुंजार शतकानंतरही भारताला हा सामना गमवावा लागला.
advertisement
2/7
न्यूझीलंडने दिलेलं 338 रनचं आव्हान पार करताना भारताचा 296 रनवर ऑलआऊट झाला. रोहित, गिल, राहुल, श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा हे स्टार खेळाडू सामन्यात फेल गेले, पण विराटने 124 रनची खेळी केली.
advertisement
3/7
विराट कोहलीला या सामन्यात नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांनीही साथ दिली. रेड्डीने 57 बॉलमध्ये 53 आणि हर्षित राणाने 43 बॉलमध्ये 52 रन केले. हर्षितने त्याच्या या खेळीमध्ये 4 फोर आणि 4 सिक्स ठोकल्या.
advertisement
4/7
हर्षित राणा याच्यावर मागच्या काही काळापासून टीकेची झोड उठली होती. गौतम गंभीरचा फेवरेट खेळाडू असल्यामुळे राणाची भारतीय टीममध्ये निवड होत असल्याचे आरोपही झाले, पण नितीश राणाने या सगळ्या आरोपांना बॅट आणि बॉलने प्रत्युत्तर दिलं आहे.
advertisement
5/7
हर्षित राणाने या सामन्यात अर्धशतक तर केलंच, पण त्याआधी 3 विकेटही घेतल्या. फास्ट बॉलिंगसह आठव्या क्रमांकावर बॅटिंग करण्याच्या क्षमतेमुळे हर्षितची टीम इंडियामध्ये निवड झाली. हर्षितने त्याची ही निवड योग्य असल्याचं सिद्ध करून दाखवलं आहे.
advertisement
6/7
टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला दुखापतींमुळे अनेकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब राहावं लागलं. हार्दिकच्या गैरहजेरीमध्ये टीम इंडिया फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर शोधत होती, त्यामुळे हर्षित राणाची टीममध्ये निवड केली गेली.
advertisement
7/7
टीम इंडियाने हा सामना गमावला असला, तरी हर्षित राणाने मात्र बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये केलेली कामगिरी दिलासादायक म्हणावी लागेल. या कामगिरीमधून हर्षितने तो 32 वर्षांच्या हार्दिकसाठी पर्याय ठरू शकतो, हे दाखवून दिलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : गंभीरच्या फेवरेटने फिक्स केली टीम इंडियातली जागा, 32 व्या वर्षीच मॅच विनरचं करिअर संपवलं!