TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्र सध्या लाटेतून वाचला पण नवं संकट समोर, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
पुढील तीन दिवस राज्यात थंडी कमीच राहण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात पुन्हा घट होऊन थंडी वाढू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्र सध्या लाटेतून वाचला पण नवं संकट समोर, हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात सध्या थंडीचा जोर तुलनेने कमी असून तापमानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सकाळी आणि रात्री काही भागांत गारवा जाणवत असला तरी दुपारच्या वेळेत उष्णतेचा त्रास वाढत आहे.
advertisement
2/7
पुढील तीन दिवस राज्यात थंडी कमीच राहण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात पुन्हा घट होऊन थंडी वाढू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पाहुयात, 20 जानेवारी रोजी राज्यातील हवामान कसे राहील.
advertisement
3/7
कोकण विभागासह राज्यातील बहुतांश भागांत 20 जानेवारी रोजी हवामान मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत आकाश स्वच्छ राहणार असून पावसाची शक्यता नाही. दिवसा उष्णतेचा प्रभाव जाणवण्याची शक्यता असून कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतकं राहील. सकाळी आणि रात्री सौम्य गारवा जाणवेल, मात्र दुपारी उकाडा जाणवू शकतो.
advertisement
4/7
पश्चिम महाराष्ट्रात पहाटे थंडीचा अनुभव येणार असून त्यानंतर तापमान हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि परिसरात सकाळच्या वेळेत धुक्याची शक्यता असून आकाश अंशतः निरभ्र राहील. येथे कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज आहे. सकाळी गारवा आणि दुपारी उष्णता असा मिश्र हवामानाचा अनुभव नागरिकांना येऊ शकतो.
advertisement
5/7
मराठवाडा विभागात सकाळच्या वेळेत थंड वातावरण राहणार असून दुपारनंतर सूर्यप्रकाशामुळे उष्णता वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे हवामान मुख्यतः निरभ्र राहणार असून कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतकं राहील. मागील काही दिवसांपासून तापमानात सतत बदल होत असून रात्रीचा गारवा काहीसा कमी झाला आहे.
advertisement
6/7
उत्तर महाराष्ट्रातही हवामानात फारसा बदल जाणवणार नाही. पहाटे गारवा जाणवेल, मात्र दिवसभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान सुमारे 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं राहील. काही भागांत सकाळच्या वेळेत हलकं धुकं पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
7/7
विदर्भात थंडीचा प्रभाव काही जिल्ह्यांत अजूनही कायम असून तापमानातील चढ-उतार सुरूच आहेत. नागपूरमध्ये हवामान मुख्यतः निरभ्र राहणार असून कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री गारवा जाणवेल, तर दुपारच्या वेळेत तापमान वाढल्याने उष्णता जाणवू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्र सध्या लाटेतून वाचला पण नवं संकट समोर, हवामान विभागाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल