अखेर 250 कोटींच्या बंगल्यात आलियाचा गृहप्रवेश, आलिशान घराचा एक कोपरा मात्र कपूर्सना भावुक करणारा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Alia Bhatt - Ranbir Kapoor New Home : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं 250 कोटींचं घर अखेर बनून तयार झालं आहे. दोघांनी लेक राहासह घरात गृहप्रवेश केलाय.
advertisement
1/8

बॉलीवूडचं पावर कपल समजले जाणारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नवीन घराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ गेल्या वर्षभरापासून चर्चेत होते. अखेर आलिया आणि रणबीर यांनी त्यांचा 250 कोटींच्या आलिशान घरात गृहप्रवेश केला आहे. आलियाने तिच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
advertisement
2/8
राहाचा जन्म होण्याआधीच त्यांनी तिच्यासाठी खास जागा खरेदी केली होती. राहाचा जन्म झाला तेव्हा त्यांचं हे नवा आलिशान घर अर्ध तयार झालं होतं. नुकताच राहाचा तिसरा बर्थडे झाला आणि तिला घेऊन रणबीर-आलियाने नव्या घरात गृहप्रवेश केला.
advertisement
3/8
आलियाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत. त्यात तिच्या नव्या घराची झलक पाहायला मिळतेय. तसंच राहाच्या बर्थडे पार्टीचे फोटोही पाहायला मिळत आहेत.
advertisement
4/8
सीरीजमधील पहिलाच फोटो राहाच्या बर्थडे पार्टीची आहे. आलिया आणि राहा दोघीही पिंक आउटफिटमध्ये खूपच गोंडस दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये आलिया-रणबीर गृहप्रवेश करताना दिसतात.
advertisement
5/8
आलियाने परिधान केलेली पीच कलरची साडी आणि रणबीरचा व्हाइट कुर्ता-पायजामा या दोघांचा लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे.
advertisement
6/8
आलिया आणि रणबीरच्या 250 कोटींच्या बंगल्यातील एक कोपरा मात्र सगळ्या कपूर्सना भावुक करणारा आहे. नव्या घरात आलिया-रणबीर यांनी ऋषी कपूर यांच्या आठवणींनाही खास स्थान दिलंय.
advertisement
7/8
आलियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये घराच्या एका कोपऱ्यात ऋषी कपूर यांचा फोटो दिसतोय. एका फोटोमध्ये नीतू कपूर आलियाला मिठी मारताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये रणबीर ऋषी कपूर यांच्या फोटोसमोर नतमस्तक होताना दिसतोय. हा फोटो पाहून चाहतेही भावूक झालेत.
advertisement
8/8
गृहप्रवेश पूजा करतानाच राहाचीही सुंदर झलक दिसतेय. छोटी राहा अक्षता हातात घेऊन बसलेली दिसतेय. एका फोटोमध्ये ती पप्पा रणबीरच्या मांडीवर बसलेली असून दिसतेय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अखेर 250 कोटींच्या बंगल्यात आलियाचा गृहप्रवेश, आलिशान घराचा एक कोपरा मात्र कपूर्सना भावुक करणारा