21 वर्ष सिनेसृष्टीत काम, अमृता खानविलकरने आता घेतला मोठा निर्णय, सुरू करतेय नवी इनिंग
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकरनं तिच्या 21 वर्षांच्या करिअरनंतर मोठा निर्णय घेतला आहे. अमृता खानविलकरने पोस्ट शेअर करत तिच्या नव्या इनिंगची माहिती दिली.
advertisement
1/9

अभिनेत्री अमृता खानविलकर मराठी मनोरंजन विश्वातील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. अमृताने अनेक सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. प्रेक्षकांनीही अमृताला प्रचंड प्रेम दिलं.
advertisement
2/9
अमृताने फक्त अभिनयातून नाही तर आपल्या नृत्यातूनही प्रेक्षकांची मनं जिंकली. वाजले की बारा ते चंद्रा पर्यंत अमृताने तिच्या अदाकारीने प्रेक्षकांनी भुरळ घातली. संपूर्ण महाराष्ट्रात अमृताचा चाहता वर्ग आहे.
advertisement
3/9
गेली 21 वर्ष अमृता मराठी मनोरंजन विश्वात काम करतेय. गोलमाल या मराठी सिनेमातून 2006 साली अमृताने डेब्यू केला. तिची या सिनेमातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
advertisement
4/9
'साडेमाडे तीन', 'नटरंग', 'कट्यार काळजात घुसली', 'शाळा', 'आयना का बायना', 'वेलकम जिंदगी', 'चोरीचा मामला', 'चंद्रमुखी' सारख्या अनेक मराठी सिनेमांत तिनं काम केलं आहे. मराठीबरोबरच 'राझी', 'मलंग', 'डॅमेज' सारख्या हिंदी सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही अमृतानं आपल्या अभिनयाची छाप सोडली.
advertisement
5/9
मोठ्या पडद्याबरोबरच अमृता टेलिव्हिजनवरही काम केलं. 'एका पेक्षा एक' सारखा मराठी रिअलिटी शो तिने गाजवला. या शोची रनरअप ठरली होती. त्यानंतर 'जिवलगा' या प्रसिद्ध मालिकेतही काम केलं.
advertisement
6/9
सिनेमा, मालिका, वेब सीरिजमध्ये काम केल्यानंतर अमृताच्या तिच्या करिअरमध्ये मोठा निर्णय घेतला आहे. अमृताने तिच्या करिअरची नवी इनिंग सुरू केली. नुकत्याच एक पोस्टमधून अमृताने ही बातमी चाहत्यांनी दिली.
advertisement
7/9
अभिनेत्री अमृता खानविलकर आता रंगमंचावर आपल्या अभिनयाची छाप उमटवताना दिसणार आहे. अमृतानं नाट्यसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं आहे. 'लग्न पंचमी' असं अमृताच्या नाटकाचं नाव आहे.
advertisement
8/9
मधुगंधा कुलकर्णी लिखित व निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित या नाटकातून अमृता नाट्यसृष्टीत पदार्पण करतेय. अमृतासोबत अभिनेता कोण असणार ते अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
advertisement
9/9
"कॅमेऱ्यापासून रंगमंचापर्यंत… अभिनयाचा हा नवा प्रवास! तुमच्या प्रेमाला आणि टाळ्यांना पुन्हा एकदा पात्र होण्यासाठी…लवकरच येतेय", असं म्हणत अमृताने तिच्या नव्या नाटकाची घोषणा केली आहे. अमृता खानविलकरची रंगभूमीवर धमाकेदार एन्ट्री पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
21 वर्ष सिनेसृष्टीत काम, अमृता खानविलकरने आता घेतला मोठा निर्णय, सुरू करतेय नवी इनिंग